शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
2
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
3
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
4
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
5
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
6
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
7
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
9
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
10
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
11
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
12
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
13
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
15
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
16
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
17
मुंबईतील ६ पैकी ३ जागांवर शिवसेना vs शिवसेना; एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोण पडणार भारी?
18
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
19
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
20
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द

पूरग्रस्त भागातील सर्वेक्षण तातडीने पूर्ण करा; जिल्हाधिकारी ठाकरे यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 8:12 PM

नागपूरसोबतच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या संदर्भातील प्राथमिक नुकसानाची आकडेवारी पुढे आली असली तरी प्रत्यक्ष नुकसान हे महसूल विभागाच्या सर्वेक्षणानंतर ठरणार आहे.

ठळक मुद्देसावनेर, कळमेश्वर, कामठी, कन्हान, मौदा तालुक्यांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केला. त्यांनी गुरुवारी सावनेर, कळमेश्वर, कामठी, कन्हान, मौदा या तालुक्यांना भेटी देऊन अनेक गावातील पूर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महसूल यंत्रणेला तातडीने सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले.नागपूरसोबतच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या संदर्भातील प्राथमिक नुकसानाची आकडेवारी पुढे आली असली तरी प्रत्यक्ष नुकसान हे महसूल विभागाच्या सर्वेक्षणानंतर ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला गती देण्यासाठी व सर्वेक्षणाच्या संदर्भातील कार्यवाहीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांनी ही भेट दिली आहे.

पूर ओसरून गेल्यानंतरच्या परिस्थितीत करावयाच्या कामकाजाचा त्यांनी यावेळी प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. सर्वात आधी शुद्ध पिण्याचे पाणी व आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सर्वेक्षण सुरू असतानाच या कामाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही त्यांनी यावेळी यंत्रणेला बजावले. काही गावांमध्ये वाहून गेलेल्या रस्त्याचीदेखील त्यांनी पाहणी केली. तर गावांमध्ये ज्या ठिकाणी पुराचे पाणी घुसले त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन गावकऱ्यांसोबत चर्चा केली.

पुरासोबतच त्यांनी कोरोना स्थितीचादेखील आढावा घेतला आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण सुरू असून यामध्ये किती नुकसान झाले हे सर्वेक्षणाच्या आकडेवारीनंतर स्पष्ट होणार आहे. आज जिल्हाधिकारी ठाकरे यांनी कन्हान तालुक्यातील सोनेगाव, मौदा तालुक्यातील शांतीनगर या गावांना भेट दिली. तर सावनेर, कळमेश्वर, कामठी, मौदा, येथील तहसील कार्यालयात व कन्हान नगर परिषद कार्यालयामध्ये आढावा घेतला.

 

टॅग्स :floodपूर