शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

चिक्की घोटाळ्याची चौकशी पूर्ण, कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:08 IST

महिला व बालविकास विभागांतर्गत करण्यात आलेल्या चिक्की व अन्य सामग्रीची नियमबाह्य खरेदीचा मुद्दा बराच गाजला होता. या खरेदीतील गैरव्यवहारासंबंधीची चौकशी पूर्ण झाली असून, कारवाई मात्र झालेली नाही, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

नागपूर : महिला व बालविकास विभागांतर्गत करण्यात आलेल्या चिक्की व अन्य सामग्रीची नियमबाह्य खरेदीचा मुद्दा बराच गाजला होता. या खरेदीतील गैरव्यवहारासंबंधीची चौकशी पूर्ण झाली असून, कारवाई मात्र झालेली नाही, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. विधान परिषदेत या संदर्भात धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांकरिता पुरविण्यात येणाºया शिक्षणोपयोगी साहित्य, पौष्टिक आहार इत्यादी संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भात झालेल्या चौकशीचा अहवाल मागील वर्षी ८ डिसेंबर रोजी शासनाला प्राप्त झाला.या प्रकरणी चौकशी अधिकारी व त्यांना त्याप्रमाणे अहवाल सादर करावयाच्या सूचना देणाºया संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना निलंबित करून, त्यांच्याविरुद्ध चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी जनप्रतिनिधींनी केली होती.शासकीय कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा नाहीनागपूर : राज्य शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात येणार असल्याची चर्चा कर्मचाºयांमध्ये रंगली होती. मात्र, या संदर्भात कुठलीही समिती गठित करण्यात आलेली नाही, असे राज्य शासनातर्फे बुधवारी स्पष्ट करण्यात आले आहे.पाल्यांना नोकरीत प्राधान्यनागपूर : आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांना ‘क’वर्ग शासकीय नोकरीत प्राधान्य दिले जाईल, असा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.पोलिसांना आहारभत्तानागपूर : पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आयुक्तालयांतर्गत, तसेच काही जिल्ह्यात आठ तास कर्तव्य प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, २४ तासांच्या कालावधीत सतत १० तासांच्या वर बंदोबस्त ड्युटी किंवा इतर कामासाठी हजर राहावे लागल्यास, संबंधित पोलीस कर्मचारी व अधिकाºयांना अतिकालिक (आहार) भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, फोटोग्राफर यांना १,५०० रुपये तर पोलीस हवालदार आदींना प्रतिमाह १,३५० रुपयेप्रमाणे आहारभत्ता मंजूर केला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७nagpurनागपूर