शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  मिहान प्रकल्पाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:02 IST

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय वायुदलाच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. वायुदलाची जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

ठळक मुद्देभारतीय वायुदल जमिनीचे हस्तांतरण : वायुदलाची २१९.५८ हेक्टर जमीन एमएडीसीकडे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय वायुदलाच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. वायुदलाची जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील मोठा अडथळा दूर झाला आहे.वायुदलाला मिळाली ३७७.५९ हेक्टर जमीनभारतीय वायुदलाकडे असलेली २१९.५८ हेक्टर जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या ताब्यात देण्यात आली. त्याऐवजी भारतीय वायुदलाला सलग ३७७.५९ हेक्टर जमीन मिहानतर्फे देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व भारतीय वायुदलाचे स्टेशन कमांडंट व ग्रुप कॅप्टन ए.के. चौरसिया यांनी जमीन हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज सह्या करुन प्रक्रिया पूर्ण केली. भारतीय वायुदलाच्या जमिनीचे संपूर्ण दस्तऐवज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपविण्यात आले.यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मिहान प्रकल्पाचे पुनर्वसन अधिकारी प्रकाश पाटील, मिहानचे तांत्रिक सल्लागार एस.व्ही. चहांदे, मुख्य अभियंता एस.के. चॅटर्जी, विंग कमांडर मनोज महेता, स्क्वॉड्रन लिडर काळे, एस. सिंग, सी.पी. सिंग तसेच इस्टेट आॅफिसर निखार, जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख) सूर्यकांत मोरे, नगरभूमापन अधिकारी भूषण मोहिते उपस्थित होते.१६ वर्षांची प्रतीक्षा पूर्णमिहान प्रकल्पाची २००२ मध्ये घोषणा झाली. त्यावेळी भारतीय वायुदलाकडील २७८ हेक्टर जमीन मिहान प्रकल्पाकरिता हस्तांतरित करुन त्याऐवजी भारतीय वायुदलाला सलग ४०० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमिनीच्या हस्तांतरणासंदर्भात सातत्याने संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. तसेच केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत १७ मे २०१५ रोजी जमीन हस्तांतरणाबाबत चर्चा करून दोन टप्प्यामध्ये जमिनीचे हस्तांतरण करण्याचे निश्चित करण्यात आले होते.मे २०१६ पासून भारतीय वायुदल व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या जमिनीची मोजणी तसेच आखणी इत्यादी बाबींची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन ही प्रक्रिया पूर्ण केली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मिहान प्रकल्पासाठी भारतीय हवाई दलाची जमीन उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

टॅग्स :Mihanमिहानnagpurनागपूर