शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील नगरसेवक बंटी शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 10:42 IST

कोतवाली पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह ६० ते ८० जणांच्या विरोधात कलम ३५३, मुंबई पोलीस अ‍ॅक्टअंतर्गत कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देमनपा प्रशासनाची तक्रारसभागृहात आशा कार्यकर्त्यांना घुसवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका सभागृहाचे कामकाज सुरू असताना आशा कार्यकर्त्या यांना चिथावणी देऊ न सभागृहात घुसण्यास प्रवृत्त क रून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह ६० ते ८० जणांच्या विरोधात कलम ३५३, मुंबई पोलीस अ‍ॅक्टअंतर्गत कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.बंटी शेळके यांनी आशा कार्यकर्त्यांना सभागृहात घुसवून शासकीय कामकाजात अडथळा आणला होता. याची गंभीर दखल घेत आयुक्त अश्विन मुदगल यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निगम सचिव हरीश दुबे यांनी शनिवारी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर रात्री शेळके यांच्याससह ६० ते ८० जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.शनिवारी सर्वसाधारण सभेत झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना अचानक आरोग्य विभागातील आशा कार्यकर्त्या पोलीस व सुरक्षा रक्षकांना न जुमानता सभागृहात घुसल्या. या गोंधळामुळे महापौर नंदा जिचकार यांना शनिवारी सर्वसाधारण सभेचे कामकाज स्थगित करावे लागले. शेळके यांनीच आशा कार्यकर्त्यांना सभागृहात घुसल्याचा आरोप आहे.सभागृहाबाहेर आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियनच्या बॅनरखाली आंदोलन करीत होते. मात्र शेळके यांनी आशा कार्यकर्त्यांना सभागृहात घुसण्याचा सल्ला दिला. त्यांना घेऊ न सभागृहाच्या गेटपुढे आले. तैनात सुरक्षा कर्मचाºयांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरक्षा रक्षकांना न जुमानता आशा कार्यकर्त्या बॅनर व झेंडे घेऊ न नारेबाजी करीत सभागृहात घुसल्या. मात्र शेळके येथून निघून गेल्याचा आरोप आहे. शेळके यांच्या या भूमिकेवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी बोलण्याचे टाळले. हा प्रकार योग्य नसल्याचे म्हटले तर सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.

सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू असताना सुरक्षा रक्षकांना न जुमानता आंदोलक सभागृहात घुसले. यामुळे कामकाजात बाधा निर्माण झाली. याची दखल घेत शनिवारी निगम सचिवांना संबंधितांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश दिले होते.- अश्विन मुदगल, आयुक्त

टॅग्स :Crimeगुन्हा