शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

बिल्डर डांगरेविरुद्ध पुन्हा एक तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:25 AM

उच्च न्यायालयाने मध्यस्थ म्हणून नेमलेल्या वकिलाच्या कक्षात वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार प्रदीप नीळकंठ खोडे यांनी सक्करदरा पोलिसांकडे नोंदवली आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही या तक्रारीतून खोडे यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमध्यस्थ वकिलाच्या कक्षात धमकी : सक्करदरा पोलिसांनी नोंदवली एनसी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाने मध्यस्थ म्हणून नेमलेल्या वकिलाच्या कक्षात वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार प्रदीप नीळकंठ खोडे यांनी सक्करदरा पोलिसांकडे नोंदवली आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही या तक्रारीतून खोडे यांनी व्यक्त केली आहे.डांगरेविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा यापूर्वीच दाखल झाला आहे. यासंबंधाने प्रदीप खोडे यांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने मध्यस्थ म्हणून अ‍ॅड. श्रीधर पुरोहित यांची नियुक्ती केली आहे. त्यासंबंधाने अ‍ॅड. पुरोहित यांच्या कक्षात २४ जूनला दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास विजय डांगरे आणि प्रदीप खोडे आले होते. डांगरे आणि खोडेमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारासंबंधीची चर्चा सुरू असताना, खोडे यांनी डांगरेंना मी तुमच्या घरी रक्कम आणून दिली होती आणि परत घेण्यासाठी अनेक वर्षांपासून चकरा मारत आहो. मला आर्थिक आणि मानसिक त्रास झाला, मात्र माझी रक्कम परत मिळाली नाही, असे खोडे यांनी म्हटले. त्यावर गरमागरम चर्चा झाल्यानंतर डांगरे लगेच उठून उभे झाले. ‘तू आता बाहेर निघ, चल तुला पाच मिनिटात निपटवून देतो’, अशी धमकी अ‍ॅड. पुरोहित यांच्या कक्षात दिल्याचे तक्रारीत खोडे यांनी नमूद केले आहे. अ‍ॅड. पुरोहित यांनी दोघांनाही शांत केल्यानंतर प्रकरण निवळल्याचे खोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. डांगरे यांची वृत्ती लक्षात घेता आपल्याला आणि आपल्या परिवारातील सदस्याच्या जीवाला धोका आहे, असेही या तक्रारीत खोडे यांनी म्हटले आहे. सक्करदरा पोलिसांनी या तक्रारीची नोंद कलम ५०६ अन्वये अदखलपात्र अशी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे