शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हजारो वर्षे हक्कापासून वंचित ठेवल्याची भरपाई करा :सुखदेव थोरात यांचे परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:31 IST

बहुजन समाजाची नुकसान भरपाई करावी, देशातील भेदभाव मिटवावा व मगच आरक्षणाला विरोध करावा, असे परखड मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभेदभाव मिटवा, मगच आरक्षणाचा विरोध करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशामध्ये अस्पृश्य वर्गावर २००० हजार वर्षापासून अत्याचार झाले. दलित व बहुजन समाजाला जमिन, उद्योगधंदे व शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. म्हणून ते भूमिहिन, अशिक्षित व उद्योगधंद्याविना राहिले व याचा लाभ उच्च वर्गाने घेतला. त्यामुळे या बहुजन समाजाची नुकसान भरपाई करावी, देशातील भेदभाव मिटवावा व मगच आरक्षणाला विरोध करावा, असे परखड मत युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.बॅरिस्टर राजाभाउ खोब्रागडे प्रतिष्ठान आणि आवाज इंडिया टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरक्षण : इतिहास, प्रासंगिकता व भविष्य’ या विषयावर बॅ. राजाभाउ खोब्रागडे सभागृह, टेका नाका येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धनवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एस. चंगोले, आवाज इंडिया टीव्हीचे संचालक अमन कांबळे, राजाभाउ खोब्रागडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खोब्रागडे, भीमराव वैद्य, प्रितम बुलकुंदे उपस्थित होते. डॉ. थोरात पुढे म्हणाले, भारतामध्ये आजही प्रचंड असमानता आहे, बहुजन समाजातील कोट्यावधी लोकांना समान संधी नाकारल्या जात आहेत. देशामधे असलेला भेदभाव मिटावा, सर्वांना समान संधी प्राप्त व्हावी यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. जगातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये अफर्मिटीव्ह अ‍ॅक्शन अंतर्गत आरक्षण देण्यात येते पण भारतामध्ये मात्र आरक्षणाला विरोध केला जातो, ही शोकांतिका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हजारों वर्ष या देशातील बहुजन समाजाला शिक्षण, सम्पत्ति, जमीन आदि अनेक मूलभूत अधिकार नाकारण्यात आले. त्याची नुकसान भरपाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकेत या धोरनाची चर्चा सुरु आहे. यामध्ये जमीन वाटप, उद्योगधंद्यांचे वाटप आणि शैक्षणिक विकास आदी सुविधांचा समावेश असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी डॉ. चंगोले यांनी सम्राट अशोक, शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात देश सुजलाम सुफलाम असल्याचे सांगत बहुजन शासकांच्या काळातच जनता सुखी राहते, असे विचार व्यक्त केले. अमन कांबळे यांनी विद्यापीठांचे कुलगुरू, न्यायपालिका किंवा प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावर विशिष्ट वर्गालाच प्राधान्य का दिले जाते, असा सवाल करीत समान संधीचा पुरस्कार केला.आरक्षणामुळे गुणवत्ता घटते हा खोटा प्रचारआरक्षण दिल्यामुळे गुणवत्ता कमी होते, असा आक्षेप घेतला जातो. हा केवळ खोटा प्रचार नसून हे एक षडयंत्र असल्याची टीका डॉ. थोरात यांनी केली. दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिका अश्विनी देशपांडे यांनी भारतीय रेल्वेमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या अधिकारी, कर्मचारी तसेच उच्चवर्णिय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर संशोधन केले. त्यांनी विविध संशोधन आणि इंडिकेटर्सच्या माध्यमातून त्यांनी आरक्षणामुळे गुणवत्ता कमी होत नाही, उलट ती बाढते असा निष्कर्ष दिला. आरक्षण विरोधकांनी या सर्व बाबींचा प्रामाणिकपणे अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :reservationआरक्षणnagpurनागपूर