शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यात आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:31 IST

विदर्भातल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये आर्थिक व चौकशीतील विलंबाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करायची की नाही या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निर्णय राखून ठेवला.

ठळक मुद्देहायकोर्टाने राखून ठेवला निर्णय : याचिकाकर्ते सकारात्मक, प्रतिवादींनी केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये आर्थिक व चौकशीतील विलंबाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करायची की नाही या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निर्णय राखून ठेवला.याचिकाकर्त्यांचे वकील फिरदोस मिर्झा व श्रीधर पुरोहित यांनी समिती स्थापन करण्याच्या आवश्यकतेवर भर देऊन यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय सादर केले. प्रतिवादी राज्य सरकारतर्फे वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता प्रसाद ढाकेफाळकर तर, माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता अनिल साखरे यांनी बाजू मांडताना समिती स्थापन करण्यास विरोध केला. समिती स्थापन केल्यास अधिकाऱ्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण होईल असे त्यांनी सांगितले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या मुद्यावर निर्णय देण्यासाठी २ आॅगस्ट ही तारीख निश्चित केली. न्यायालयाचा निर्णय सकारात्मक आल्यास, त्यानंतर समितीची रचना, कार्यक्षेत्र, अधिकार इत्यादीबाबत पुढील निर्देश दिल्या जातील.गैरव्यवहाराच्या चौकशीस विलंब झाल्यास आरोपी सरकारी कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमाचा फायदा मिळतो. आरोपी सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध, तो सेवानिवृत्त झाल्यावर, चार वर्षांवरपूर्वीच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करता येणार नाही अशी तरतूद या नियमात आहे. १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत विविध विभागांमधील ३२६ गैरव्यवहार प्रकरणांतील ५९८ आरोपी कर्मचारी या तरतुदीचा लाभ मिळून कारवाईच्या कक्षेतून बाहेर गेले आहेत. तसेच, कोणत्याही गैरव्यवहारामुळे सार्वजनिक निधीचे नुकसान होते. लोकशाहीच्या सुदृढतेसाठी हे नुकसान जबाबदार व्यक्तींकडून भरून काढणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने या बाबी लक्षात घेता दोन्ही बाबतीत जबाबदारी निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित करून याचिकाकर्ते व प्रतिवादींच्या वकिलांना यावर युक्तीवाद करण्यास सांगितले होते. विदर्भातील सिंचन घोटाळ्यासंदर्भात अतुल जगताप यांच्या चार तर, जनमंच या सामाजिक संस्थेची एक जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प