उच्च न्यायालयाने नेमलेली समिती शनिवार घेणार ६२ रुग्णालयांची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:35 PM2020-09-18T21:35:47+5:302020-09-18T21:37:21+5:30

कोव्हिडच्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३८ रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहे. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली पाच सदस्यीय समिती उर्वरीत ६२ रुग्णालयांची शनिवार १९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार आहे.

A committee appointed by the High Court will hear 62 hospitals on Saturday | उच्च न्यायालयाने नेमलेली समिती शनिवार घेणार ६२ रुग्णालयांची सुनावणी

उच्च न्यायालयाने नेमलेली समिती शनिवार घेणार ६२ रुग्णालयांची सुनावणी

Next
ठळक मुद्दे१०२ पैकी केवळ ३८ खासगी रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालये

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोव्हिडच्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३८ रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहे. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली पाच सदस्यीय समिती उर्वरीत ६२ रुग्णालयांची शनिवार १९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेणार आहे.
खासगी रुग्णालय कोव्हिड रुग्णालय म्हणून सुरू करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाच्या काय समस्या आहेत आणि रुग्णांना होणाऱ्या समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीचे गठन केले आहे. या समितीत महापौर, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, आयएमएचे अध्यक्ष आणि खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अनिल लद्धड यांचा समावेश आहे. समितीची पहिली बैठक शुक्रवारी महापौर कक्षात पार पडली. बैठकीला महापौर संदीप जोशी, विभागीय अयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुधाकर तेलंग, मनपा आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉ. अनिल लद्दड उपस्थित होते. सदर बैठकीत उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीचे नेमके कार्य काय, याबाबत चर्चा करण्यात आली.
ही समिती उर्वरित रुग्णालयांच्या समस्या काय यासंदर्भात अभ्यास करून त्याचा अहवाल न्यायालयापुढे सादर करणार आहे. त्याच अनुषंगाने खासगी रुग्णालयांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी समिती शनिवार १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत सुनावणी घेणार आहे. यानंतर विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन आणि स्वयंसेवी संस्थांनाही समस्या ऐकून घेण्यासाठी बोलावण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांच्या समस्या ऐकून घेतानाच त्यांनी लवकरात लवकर कोव्हिड रुग्णांसाठी मनपाला बेड्स उपलब्ध करून द्यावेत, यासंदर्भातही त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
समितीचे कामकाज योग्य पद्धतीने व्हावे, समिती आणि खासगी रुग्णालय प्रशासनामध्ये योग्य समन्वय साधला जावा, यासाठी समितीचे सचिव म्हणून उपायुक्त मिलिंद मेश्राम यांची नेमणूक सदर बैठकीत करण्यात आली. बैठकीला उपायुक्त मिलिंद मेश्राम, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

Web Title: A committee appointed by the High Court will hear 62 hospitals on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.