शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

७१ वर्षानंतर पृथ्वीजवळ आलाय ‘हा’ धुमकेतू, २१ एप्रिल रोजी जवळच्या बिंदूवर, डोळ्याने होणार दर्शन

By निशांत वानखेडे | Updated: March 17, 2024 18:30 IST

ग्रह ताऱ्यांसाेबत आपल्याला कधी कधी धुमकेतूंचेही दर्शन घडत असते.

नागपूर: ग्रह ताऱ्यांसाेबत आपल्याला कधी कधी धुमकेतूंचेही दर्शन घडत असते. असाच एक नवा पाहुणा म्हणजे ‘पाॅन्स-ब्रुक्स’ धुमकेतू हाेय. २१ एप्रिल राेजी पश्चिम आकाशात देवयानी तारकासमुहाजवळ या धुमकेतूचे उघड्या डाेळ्यांनी दर्शन घेता येईल. हा धुमकेतू ७१ वर्षांनी पृथ्वी व सूर्याजवळ येत आहे.

खगाेल अभ्यासक व विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिलेल्या माहितीनुसार १८१२ साली जीन लुईस पाॅन्स या खगाेल शास्त्रज्ञाला व त्यानंतर १८८३ साली विल्यियम राॅबर्ट ब्रूक या खगाेल शास्त्रज्ञाला हा धुमकेतू सापडला हाेता. त्याचा भ्रमण कालावधी ७१ वर्षाचा असून यावेळी ताे पुन्हा दिसणार आहे. जून महिन्यात ताे पृथ्वीच्या आणखी जवळ राहणार असून लहान दुर्बिनीने त्याचे सुंदर रूप पाहता येईल. या काळात ताे सूर्याच्याही जवळ असेल. हॅली धुमकेतूप्रमाणे पाॅन्स-ब्रूक्स धुमकेतूच्या लांब शेपटीचे दर्शन रात्रीच्या प्रारंभी पश्चिमेस घेता येईल.

पाच ग्रह दर्शनार्थ सज्जपृथ्वीवरून मंगळ, बुध, गुरु, शूक्र आणि शनी हे ग्रह आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो. यामध्ये बुध व गुरु ग्रह संध्याकाळी पश्चिम आकाशात तर मंगळ, शूक्र व शनी ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर बघता येतील.

आकर्षक घडामोडींचा सप्ताह२०मार्च रोजी महाविषुवदिन असुन या पृथ्वीचे दोन्ही गोलार्धात दिवस रात्र समान असतात, विषुववृत्तावर बारा बारा तासांचा दिवस व रात्र असते सूर्य बरोबर निश्चित पूर्वेला असतो. यालाच वसंत संपात दिन म्हणतात. २१ ला सौर चैत्रारंभ होत असुन, पर्यावरण पूरक असा जागतिक वनदिन साजरा केला जातो.

शूक्र व शनी महाग्रहांची युती

  • २२ मार्च राेजी सर्वात तेजस्वी शूक्र व वलयांकित शनी ग्रह युती स्वरूपात अगदी जवळ बघण्याची संधी पहाटे पूर्व आकाशात असेल. पहाटे ३.३६ वाजता यांच्यातील अंतर सर्वात कमी असेल.
  • २३ रोजी पृथ्वी व चंद्र यांच्या मधील अंतर अधिक असल्याने चंद्र आकाराने जरा लहान दिसेल.
  • २४ ला होळी पौर्णिमा असुन निसर्गातील सुरू होणाऱ्या विविधरंगी उत्सवात निसर्ग संवर्धनार्थ सहभागी होता येईल.
टॅग्स :nagpurनागपूर