लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंध्रा असोसिएशनच्या उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवनम्मध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय ‘सखी आनंदोत्सवा’स रंगारंग सुरुवात झाली आहे. कलावंतांशी संवाद साधण्यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सखी उत्साहित झाल्या. शिवाय, शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील आकर्षक व उपयोगी वस्तूंनी सजलेल्या स्टॉल्सवर खरेदीचा आनंद त्यांनी घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका डॉ. परिणय फुके, रिचाज युनिक क्लिनिकच्या संचालिका डॉ. रिचा जैन, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कुलपती नीलम मिश्रा, माजी सैनिक महिला संघटनच्या शीला टाले, पितांबरीचे प्रवीण यादव व विक्रम टी ग्रुपचे विक्री व्यवस्थापक कोमल उमरे यांच्या हस्ते झाले.
नागपुरात 'सखी आनंदोत्सवा'स रंगारंग सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:12 IST
आंध्रा असोसिएशनच्या उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवनम्मध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय ‘सखी आनंदोत्सवा’स रंगारंग सुरुवात झाली आहे.
नागपुरात 'सखी आनंदोत्सवा'स रंगारंग सुरुवात
ठळक मुद्दे रविवारपर्यंत संवाद, शॉपिंग फेस्टिव्हल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल