शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पुन्हा चढेल कालिदास महोत्सवाचा रंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:44 IST

विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे५ ते ७ जानेवारीला आयोजन : महेश काळे, शर्वरी जमेनिस, नूरान सिर्स्टसच्या सादरीकरणाची रसिकांना मेजवानी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ ते ७ जानेवारीदरम्यान कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी कुलगुरू कालिदास यांच्या ‘विक्रमोर्वशीयम’ या विषयावर महोत्सवाची संकल्पना आहे. ५ जानेवारीला कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यातील कॅबिनेट मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याउपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, यानिमित्ताने नागपूरकर रसिकांना पुन्हा एकदा मातब्बर कलावंतांच्या शास्त्रीय संगीत, गायन व नृत्याची मेजवानी मिळणार आहे. 

विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाबाबत माहिती दिली. तीन दिवसाच्या महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताना आमंत्रित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सुकीर्ती उईके या स्थानिक कलावंताचे शास्त्रीय गायन होईल; त्यानंतर अरुपा लाहिरी यांचे भरतनाट्यम आणि त्यानंतर प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या शास्त्रीय गायनाचा आनंद रसिकांना मिळेल. दुसऱ्या दिवशी ६ जानेवारीला सप्तकच्या सहकार्याने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यापाच तत्त्वावर आधारित पंचतत्त्व हा स्थानिक कलावंतांची नृत्यनाटिका सादर होईल. रेणुका देशकर यांची संकल्पना आहे. या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन स्वाती भालेराव तर संगीत शैलेष दाणी यांचे राहणार आहे. यात विशेष सहभाग वैद्य मृणाल जामदार, संदीप शिरखेडकर व डॉ. मुरकुटे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमानंतर समन्वय सरकार यांचे सतार वादन व त्यानंतर नृत्यांगना अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे. ७ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता आदित्य खांडवे यांचे शास्त्रीय गायन व त्यानंतर सुश्री मोहंती यांची ओडिसी नृत्य व प्रसिद्ध सुफी गायिका नूरान भगिनी यांच्या सुफी गायनाची मेजवानी मिळणार आहे. तीनही दिवस सुरुवातीच्या सत्रात स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली आहे.
 रसिकांसाठी बससेवेची सोयशहरातील संगीत रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा म्हणून शहरातील विविध भागातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम संपल्यावर परत जाण्यासाठीही ही व्यवस्था असेल. दुपारी ४.३० ते ६ या वेळेत बसेस सुटतील. स्वावलंबीनगर, पारडी, कळमेश्वर, हजारी पहाड, कोराडी, पिपळा फाटा आणि बेसा या ठिकाणाहून बसेस सुटणार आहेत. शिवाय ओला आणि उबेरची व्यवस्था सभागृहापासून करण्यात आली आहे.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर