वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अमेरिकेच्या शासकीय अंतराळ एजन्सीने अलीकडेच अॅस्ट्रॉनॉमी पिक्चर आॅफ द डे या पानावर प्रसिद्ध केलेल्या गुरू या ग्रहाचे छायाचित्र हे ट्रान्सजेंडर समुदायाचे प्रतीक असलेल्या ध्वजाच्या रंगाशी तंतोतंत मिळत असल्याचे आश्चर्य उघडकीस आले आहे. पिंक न्यूज या वेबपोर्टलने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. २०१७ साली हबल स्पेस टेलिस्कोपने काढलेले हे छायाचित्र नासाने १६ आॅक्टोबर २०१८ या रोजी प्रसिद्ध केले होते. या छायाचित्रात गुरू या ग्रहाभोवती असलेल्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा रंग हा पांढरा, निळसर, गुलाबी, मोतिया अशा विविध मनोहारी छटांचा दिसत आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना नासाने, गुरूभोवती असलेल्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा रंग हा सूर्यप्रकाशाच्या विशिष्ट कोनातून झालेल्या परावर्तनामुळे निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे.
गुरू ग्रहाचा रंग ट्रान्सजेंडर ध्वजासारखा? नासाने प्रसिद्ध केले छायाचित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 11:01 IST
अमेरिकेच्या शासकीय अंतराळ एजन्सीने अलीकडेच अॅस्ट्रॉनॉमी पिक्चर आॅफ द डे या पानावर प्रसिद्ध केलेल्या गुरू या ग्रहाचे छायाचित्र हे ट्रान्सजेंडर समुदायाचे प्रतीक असलेल्या ध्वजाच्या रंगाशी तंतोतंत मिळत असल्याचे आश्चर्य उघडकीस आले आहे.
गुरू ग्रहाचा रंग ट्रान्सजेंडर ध्वजासारखा? नासाने प्रसिद्ध केले छायाचित्र
ठळक मुद्देग्रहाभोवती पांढरा, गुलाबी आणि निळसर रंगांच्या छटा