शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांकडून एकाच दिवसात १३.२५ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 23:25 IST

जीएसटी कायद्याचे पालन न करून करचोरी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी जुळलेल्या दोन कंपन्यांवर जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून एकाच दिवसात १३ कोटी २५ लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) वसूल केला आहे.

ठळक मुद्दे डीजीजीआयची कारवाई : जीएसटीची चोरी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जीएसटी कायद्याचे पालन न करून करचोरी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राशी जुळलेल्या दोन कंपन्यांवर जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून एकाच दिवसात १३ कोटी २५ लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) वसूल केला आहे.कारवाईनंतर कंपन्यांचे संचालक आणि कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ उडाली. कार्यालयाची जागा बदलवून कंपनी जीएसटी चोरी करीत असल्याचे आढळून आले. कारवाईनंतर दोन्ही कंपन्यांनी जीएसटी भरला आहे.अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील शिरपूर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडवर कारवाई करून ७.११ कोटी रुपयांचा जीएसटी वसूल केला. चौकशीदरम्यान कंपनीने कार्यालय दुसऱ्या जागी स्थलांतरित केल्याचे आढळून आले. याची माहिती जीएसटी कार्यालयाला देण्यात आली नव्हती. याप्रकारे कंपनी जीएसटीची चोरी करीत होती. जनक नीलेश पटेल हे कंपनीचे संचालक आहेत.दुसरी कारवाई याच जिल्ह्यातील देवपूर येथील एस.बी. देशमुख कंपनीवर करण्यात आली. पंकज देशमुख आणि पवन देशमुख हे कंपनीचे भागीदार आहेत. त्यांच्याकडून ६.२९ कोटींची जीएसटी वसूल करण्यात आली. चौकशीदरम्यान देशमुख यांचे बयान घेण्यात आले.एका जागेवर कंपनीचे कार्यालय सुरू केल्यानंतर ते बंद करून दुसऱ्या जागेवर कार्यालय सुरू करून जीएसटी चोरीची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. करचोरी करणाऱ्या अशा कंपन्यांवर जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या नागपूर युनिटचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. यापूर्वीही अशा प्रकारची प्रकरणे पुढे आली आहेत. यावेळी बांधकाम क्षेत्राशी जुळलेल्या दोन कंपन्यांवर २२ नोव्हेंबरला कारवाई करण्यात आली. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या नागपूर युनिटचे सहसंचालक प्रदीप गुरुमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. दोन्ही कंपन्यांची सेवा कराची स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :GSTजीएसटीnagpurनागपूर