शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तळपत्या उन्हात ड्युटी करणाऱ्या पोलिसांना ‘तो’ देतो थंड पन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 10:35 IST

उन्हातान्हात उभे राहून ड्युटी बजावणाऱ्या पोलीस दादांसाठी एका संवेदनशील माणसाने थंडगार पन्हे पाजून थंडावा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशोक खंडेलवाल असे या पोलीस सेवादाराचे नाव आहे.

ठळक मुद्देपोलीस दादांच्या सेवेत अशोक खंडेलवाल चार वर्षांपासून सेवाकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्ह चांगलेच तापायला लागले आहे. कडक उन्हाने प्रत्येकाच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र या कडक उन्हात पोलीस कर्मचाऱ्यांना भर चौकात उभे राहून ड्युटी करावी लागत आहे. चौकात कधी सावलीचा आसरा मिळतो तर कधी उन्हातच उभे राहावे लागते. असे उन्हातान्हात उभे राहून ड्युटी बजावणाऱ्या पोलीस दादांसाठी एका संवेदनशील माणसाने थंडगार पन्हे पाजून थंडावा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशोक खंडेलवाल असे या पोलीस सेवादाराचे नाव आहे.आकाशात सूर्य आग ओकत असल्याने जमिनीवर जीवांची होरपळ होत आहे. अशा समयी अनेक संवेदनशील माणसे, संस्था, संघटना आपापल्या परीने गरजवंतांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुठे पाणपोई, कुणी गरजूंना चप्पल, दुपट्टे वाटप करीत आहेत. यातच अशोक खंडेलवाल यांनी उन्हात ड्युटी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सेवेचे कार्य स्वीकारले आहे. खंडेलवाल हे एका बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. दररोज त्यांचा हा नित्यक्रम ठरला आहे. सकाळी ८ वाजतापासून घरी पन्हे बनविण्याचे काम सुरू होते. त्यांची पत्नी पौर्णिमा याही त्यांच्या कार्यात सहभागी होतात. मुबलक पन्हे बनविले की ८-१० मोठ्या बॉटल्समध्ये भरून ते घरून निघतात. त्यांचे घर असलेल्या लिबर्टी सिनेमाच्या चौकापासून त्यांचे कार्य सुरू होते. पुढे एलआयसी चौक, मॉरिस कॉलेज टीपॉर्इंट, लोहा पूल, सीताबर्डी चौक, व्हेरायटी चौक व झाशी राणी चौक येथे जातात. कधी जपानी गार्डन चौक तर कधी पागलखाना अशी त्यांची फिरस्ती सुरू असते.खंडेलवाल २०१५ मध्ये बँकेतून निवृत्त झाले. २०१६ ची एक घटना हा उपक्रम सुरू करण्याला कारणीभूत ठरली. भर दुपारी एकदा बॉटलमध्ये पन्हे भरून ते घराबाहेर पडले होते. त्यावेळी संविधान चौकात कुठला तरी मंत्री या मार्गाने जाणार असल्याने एक शिपाई त्याठिकाणी तैनात होते. खंडेलवाल यांनी त्याला स्वत:जवळचे पन्हे घेण्याचाआग्रह केला. ते घेतल्यानंतर आणखी पन्ह्याची मागणी केली. हा अनुभव समाधानकारक होता. तेव्हापासून त्यांनी पोलिसांना पन्हे वितरणाचा सेवाभाव सुरू केला. दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचे हे सेवाकार्य सुरू होते व चौकाचौकात जाऊन ते पोलिसांची तहान शमवितात. गेल्या चार वर्षापासून त्यात खंड पडला नाही. त्यांचे नातवंडही या सेवाकार्यात सहभागी होतात. चौकातील पोलीसही दररोज त्यांची वाट पाहतात व अधिकारवाणीने ‘आज आप लेट हो गये’, असे म्हणतात. हे कार्य इतरांनीही सुरू करावे, हीच माणुसकी आहे, अशी भावना व्यक्त करीत अशोक खंडेलवाल पुढच्या चौकाकडे रवाना होतात.

टॅग्स :Socialसामाजिक