नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीहून बंगळुरूसाठी निघालेल्या महिलेला राजधानी एक्सप्रेसमध्ये ट्रेस करून तिच्या जवळून ४ कोटी, २६ लाखांचे कोकेन जप्त करण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआयची) मुंबई झोनअंतर्गत नागपूर प्रादेशिक युनिटने (एनएआरयू) रविवारी ही सिनेस्टाईल कारवाई केली. या कारवाईमुळे कोकेनसारख्या महागड्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींना जबर झटका बसला आहे.
गाडी क्रमांक २२६९२ हजरत निजामुद्दीन – केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस मधून कोकेनची तस्करी केली जात असल्याची टीप डीआरआयच्या नागपूर युनिटला मिळाली. त्यावरून युनिटच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने कारवाईची तयारी करत सापळा रचला. नेहमीप्रमाणे ही गाडी रविवारी नागपूर स्थानकावर पोहचताच गाडीतील एका संशयीत महिलेवर अधिकाऱ्यांनी नजर रोखली. तपास सुरू झाला असतानाच ही गाडी पुढे निघाली. अजनी स्थानकावर ती थांबली असता संशयीत महिलेला उतरवून घेण्यात आले. तिच्या जवळच्या साहित्याची तपासणी करून तब्बल ८५३ ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे ४ कोटी, २६ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली.
बाटली शॅम्पूची, आत लपवले कोकेन
डीआरआयचे तपास अधिकारी महिलेच्या सामानाची तपासणी करताना काही वेळेसाठी संभ्रमात सापडले होते. कारण तिचे कपडे, साैंदर्य प्रसाधने आणि प्रवासादरम्यान आवश्यक कपडे, आवश्यक रक्कम एवढेच सामान तिच्याजवळ आढळले. मात्र, कपड्यांमध्ये ठेवलेल्या दोन शॅम्पूच्या बाटल्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्या बाटल्यांमधील द्रव काढल्यानंतर त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या ५० सीलबंद कॅप्सूल्स सापडल्या. या कॅप्सूल्समध्ये पांढऱ्या रंगाचे पावडर स्वरूपात कोकेन लपवून होते. फील्ड ड्रग टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यावर तो पांढरा पावडर वजा पदार्थ कोकेनच असल्याचे निष्पन्न झाले.
न्यायालयीन कोठडीत रवानगी
महिलेजवळचे ८५३ ग्रॅम कोकेन एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत जप्त करण्यात आले असून संबंधित महिलेला रविवारी १२ एप्रिला अटक करण्यात आली. प्राथमिक चाैकशीनंतर महिलेला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. महिलेच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याचे संकेत संबंधित सूत्रांनी दिले आहेत.
Web Summary : Nagpur DRI seized ₹4.26 crore worth of cocaine from a woman on the Rajdhani Express. 853 grams of cocaine was hidden in shampoo bottles. The woman was arrested and sent to judicial custody; investigation continues.
Web Summary : नागपुर DRI ने राजधानी एक्सप्रेस में एक महिला से 4.26 करोड़ रुपये का कोकीन जब्त किया। 853 ग्राम कोकीन शैम्पू की बोतलों में छिपाया गया था। महिला को गिरफ्तार कर न्यायिक हिरासत में भेजा गया; जांच जारी है।