शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

राज्यात कोळशाचा तुटवडा; वीजनिर्मितीवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 11:42 IST

ऐन सण उत्सवाच्या कालावधीत राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत वाढल्याने लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देचार केंद्रांमध्ये एकच दिवसाचा स्टॉक

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐन सण उत्सवाच्या कालावधीत राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत वाढल्याने लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. यादरम्यान राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे. सातपैकी चार केंद्रांवर केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. या परिस्थितीत वीज वितरण कंपनी महावितरणसोबतच राज्य सरकारचाही ‘रक्तदाब’वाढलेला आहे.उल्लेखनीय म्हणजे अपुरा पाऊस झाल्याने मुंबई वगळून उर्वरित राज्यात विजेची मागणी गतीने वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यातील अंतर २५० मेगावॅटपर्यंत पोहोचल्याने राज्यात जी १,जी २ आणि जी ३ फीडरवरील लोडशेडिंग लागू करण्यात आले आहे. अनेक दिवसानंतर याचा परिणाम नागपूर जिल्ह्यावरही पडला आहे. जिल्ह्यातील १८ फीडरवर लोडशेडिंग करावे लागेल. बुधवारी मागणीत थोडी कमी आल्याने लोडशेडिंगचा कालावधी कमी करण्यात आला. परंतु हा दिलासा अस्थायी स्वरूपाचा आहे. मागणी वाढल्याने परिस्थिती आणखी बिघडेल. तसेच विजेचे मुख्य स्रोत महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रावरही ‘ऊर्जा’संकट आहे.महाजेनकोनुसार त्यांच्या नाशिक, परळी, पारस आणि चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रात केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. भुसावळ आणि खापरखेडा येथे अडीच दिवस पुरेल इतका स्टॉक आहे.कोराडी वीज केंद्रात चार दिवसांचा स्टॉक आहे. परंतु तोसुद्धा आॅक्सिजनवर आहे. कारण नियमानुसार सात दिवसाचा कोळशाचा स्टॉक असल्यास वीज केंद्राला क्रिटिकल (संवेदनशील) श्रेणीत टाकले जाते. अशा परिस्थितीत राज्यातील सर्व औष्णिक वीज केंद्रांची स्थिती संवेदनशील झाली आहे. महाजेनको सूत्रांच्या दाव्यानुसार, एक दिवसही कोळशाची रॅक न पोहोचल्यास वीज केंद्रातील उत्पादन बंद होईल. परिस्थिती लक्षात घेता युनिटला क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन करण्यास सांगण्यात आले आहे. परळी वीज केंद्रातील तीन, भुसावळ, कोराडी, खापरखेड्यातील प्रत्येकी दोन, नाशिक आणि चंद्रपूर येथील प्रत्येकी एक युनिट बंद आहे. दुसरीकडे कोयना जलविद्युत प्रकल्पासाठीचे पाणीही कमी करण्यात आले आहे. पॉवर एक्सचेंजमध्ये विजेचे सरासरी दर १०.६५ रुपये प्रति युनिटवर पोहोचले आहे. त्यामुळे वीज खरेदी करणेही कठीण झाले आहे.दरवर्षीचे एकच रडगाणेआॅक्टोबर महिन्यात लोडशेडींग ही सामान्य बाब झाली आहे. गेल्यावर्षी सुद्धा १७ आॅक्टोबर रोजी लोडशेडींग करावी लागली होती. तेव्हा कृषी पंपांचा वीज पूरवठा रात्री दोन तास कमी करण्यात आला होता. सध्या दिवसा आठ तास व रात्री दहा तास वीज पुरवठा केला जातो. २०१५ मध्ये फेब्रुवारी, जुलै, सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात तर २०१६ मध्ये मे आणि सप्टेंबरमध्ये लोडशेडींग करावी लागली होती. याचे मुख्य कारण कोळश्याचा तुटवडा होच सांगण्यात आले होते. ओला कोळसा हेसुद्धा कारण सांगण्यात आले होते. अशा वेळी यापासून वाचण्यासाठी प्रभावी उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

समन्वय साधण्याचा प्रयत्नऔष्णिक वीज केंद्रातील परिस्थितीरून महाजेनको आणि कोळसा पुरवठा करणारी कंपनी वेकोलि यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. महाजेनकोचे म्हणणे आहे की, त्यांना पुरेसा कोळसा उपलब्ध होत नाही आहे तर वेकोलितील सूत्रांचे म्हणणे आहे की, कोळश्याची कुठलीही कमतरता नाही. दरम्यान बुधवारी महाजेनको आणि वेकोलि यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत वेकोलिने दावा केला की महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रांना कोळसा उपलब्ध करण्यास त्यांची पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे वीज केंद्र एक दिवसही बंद पडू देणार नाही. परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. रेल्वेशी समन्वय साधून कोळशाच्या रॅक वाढवण्यात आल्या आहेत.

टॅग्स :electricityवीज