शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 7:00 AM

Nagpur News राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्र संवेदनशील स्थितीत पोहोचले आहेत.

ठळक मुद्देचार युनिटचे उत्पादन ठप्प

कमल शर्मा

नागपूर : राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्र संवेदनशील स्थितीत पोहोचले आहेत. परिस्थिती इतकी भीषण आहे की, राज्यातील चार युनिटचे उत्पादन कोळसा नसल्याने ठप्प पडले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक ६ सुद्धा याच कारणामुळे कधीही बंद होऊ शकतो. (Coal crisis in power stations in the state; Only two days stock available)

 

तीन दिवसापेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्वच वीज केंद्र सध्या या श्रेणीत आले आहेत. महाजेनकोच्या सूत्रानुसार, सर्वाधिक कोळशाचा पुरवठा वेकोलिकडून होतो. परंतु मागील अनेक दिवसापासून अपेक्षित १८ रॅकऐवजी केवळ १० रॅकचा पुरवठा होत आहे. सर्व कोळसा कंपन्यांमधून दररोज २५ रॅक कोळशाचा पुरवठा अपेक्षित असतो. परंतु सध्या सरासरी १८ रॅक मिळत आहेत. यामुळे वीज केंद्रांमधील स्टॉक कमी होत चालला आहे. सूत्रांचा असा दावा आहे की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माेठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कोळसा उत्पादन प्रभावित झाले. वाहतुकीतही समस्या येत आहे. त्यामुळे स्टॉक कमी कमी होत चालला आहे. आता परिस्थिती अशी आहे की रोजच्या पुरवठ्यावर सर्वकाही अवलंबून आहे. गुरुवारी विजेची मागणी १८,०३७ मेगावॅट इतकी होती. ही मागणी पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. परंतु भविष्यात संकट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

-बंद पडले युनिट

कोळसा नसल्याने राज्यातील औष्णिक वीज केंद्रातील चार युनिट बंद पडले आहेत. यात चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ४, नाशिक येथील युनिट क्रमांक ५ व खापरखेडा येथील युनिट क्रमांक १ व २ यांचा समावेश आहे. कोराडीतील एक युनिट आपात्कालीन कारणांमुळे बंद आहे. येतील एक युनिट कोळशाअभावी कधीही बंद पडू शकतो.

 

- एनटीपीसी, खासगी क्षेत्रही प्रभावित, गॅसचाही तुटवडा

कोळसा संकटामुळे मौदा येथील एनटीपीसी औष्णिक वीज केंद्रातील एक युनिटही ठप्प पडले आहे. खासगी क्षेत्रही प्रभावित झाले आहे. अदानी तिरोडा वीज केंद्रातील उत्पादन कमी झाले आहे. तर रतन इंडियाचे एक युनिट व सीजीपीएलचे दोन युनिट बंद करावे लागले. दुसरीकडे गॅसआधारित उरण प्रकल्पातील एक युनिट गॅस उपलब्ध नसल्याने बंद आहे.

टॅग्स :electricityवीज