शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याला ढगांची सलामी, तापमानाला लागला ब्रेक! २४ तासांत पारा ५.६ डिग्री सेल्सियसने खाली

By नरेश डोंगरे | Updated: March 2, 2024 22:16 IST

हलका पाऊस, वातावरण बनले सुसह्य

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: डोळे दाखविणाऱ्या सूर्याला ढगाळ वातावरणाने सलामी दिल्यामुळे वाढत्या तापमानाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत पारा ५.६ डिग्री सेल्सियसने खाली उतरला आहे. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे आज दिवसाचे तापमान ३१.६ डिग्री सेल्सियस होते. दुपारी ४ वाजता हलके उन पडले तर काही ठिकाणी सायंकाळी हलका पाऊस आल्याने वातावरण काहीसे सुखद झाले होते.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार हवेच्या वेगामुळे आकाशात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली. परिणामी विदर्भातील काही भागात त्याचा परिणाम बघायला मिळाला. सकाळी हवेचा जोर तीव्र होता. सायंकाळी हवेची गती प्रति तास ७.४ किलोमिटर होती. ढगाळ वातावरणामुळे सकाळी आद्रता ५१ टक्के होती. सायंकाळी ती ४६ टक्क्यांवर पोहचली.मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा ४० ला पार करण्याच्या तयारीत दिसत आहे. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी कमाल तापमाण ३९.५ डिग्री सेल्सियसवर गेले होते. चंद्रपूर ३७.२ तर वाशिम ३७ डिग्रीवर होते.

रविवारी हलक्या पावसाचा अंदाज

नागपुरात रविवारीदेखिल ढगाळ वातावरणाचा अंदाज असून हवेचा वेग जास्त राहिल. त्यामुळे हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तापमान तीव्र होईल. पारा ४० ते ४२ डिग्रीच्या जवळ पोहचू शकतो. गेल्या एका दशकात ३१ मार्च २०१७ आणि २०१९ ला कमाल तापमान ४३.३ डिग्री नोंदविण्यात आले होते. तर, ४ मार्च १८९२ ला नागपूरचे कमाल तापमान ४५ डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले आहे. हा दिवस आतापर्यंतचा मार्च महिन्यातील सर्वात गरम दिवस राहिला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर