शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ ४ जुलैला नागपूर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 11:48 IST

पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंद करीत भाजपा सरकारचा निषेध करण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला.

ठळक मुद्देविदर्भ विरोधक नेत्यांविरुद्ध ‘गो बॅक’चे होर्डिंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन असो की, पावसाळी अधिवेशन, त्याला आमचा विरोध आहे. तेव्हा पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंद करीत भाजपा सरकारचा निषेध करण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. धनंजय धार्मिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, राजकुमार नागुलवार, गोविंद भेंडारकर, माया चवरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनात विदर्भ विरोधी नेत्यांविरुद्ध ‘गो बॅक’चे होर्डिंग लावण्यात येतील. ४ जुलैनंतर विदर्भ राज्य आंदोलन समितीची घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करून संघटनात्मक बांधणी केली जाईल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला अ‍ॅड. सुरेश वानखेडे, अ‍ॅड. टेकचंद कटरे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, विष्णूपंत आष्टीकर, अर्चना नंदघरे, दिगंबर डोंगरे, ताराबाई बारस्कर, रंजना मालपे, विजया धोटे, दीपक एम्बडवार, मुकेश मासुरकर, रियाज खान, डॉ. जी.एम. ख्वाजा, बाबा राठोड, कपिल इद्दे, भय्यालाल माकडे, प्रा. अनिल ठाकूरवार, नितीन भागवत, कृष्णराव भोंगाडे, दामोदर शर्मा, अ‍ॅड. अजय चमेडिया, रमेश नळे, अनंता येरणे, बंडू देठे, गुलाबराव धांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

येत्या निवडणुकीत भाजपला हरवणारबैठकीत भाजपाने दिलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आश्वासनावर विशेष चर्चा झाली. भाजपाने निवडणुकीपूर्वी आपले आश्वासन पाळले नाही, तर येत्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये भाजपाचा सफाया करावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. भाजपासोबत काँग्रेसही विदर्भ विरोधी आहे, तेव्हा २०१९ च्या निवडणुकीसंबंधी तिसऱ्या पर्यायाचा विचार करण्यासाठी ११ सदस्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय सुद्धा बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ