शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

निबंधक कार्यालयातील लाचखाेर लिपिक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 22:49 IST

Clerk arrested for bribery खरेदी केलेल्या जागेचे पक्के विक्रीपत्र नाेंदणीकृत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिक महिलेस १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली.

ठळक मुद्दे‘एसीबी’ची हिंगण्यात कारवाई : विक्रीपत्र नाेंदणीकृत करण्यासाठी मागितली लाच

लाेकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : खरेदी केलेल्या जागेचे पक्के विक्रीपत्र नाेंदणीकृत करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिक महिलेस १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई हिंगणा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गुरुवारी (दि. ३) दुपारी करण्यात आली.

अलका रवींद्र फेंडर (५२) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. ती हिंगणा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत आहे. तक्रारकर्ते वंजारी लेआऊट, यशाेधरानगर, नागपूर येथील रहिवासी असून, व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या पक्षकाराला महाजनवाडी, वानाडाेंगरी (ता. हिंगणा) येथील माेकळी जागा खरेदी करावयाची असल्याने त्यांनी जागेचा साैदा केला हाेता. शिवाय, तक्रारकर्त्याने पक्षकाराकडून वकालतनामा लिहून घेतला असल्याने पक्षकाराचे खरेदीसंबंधीची कामे तेच बघायचे. दाेन्ही पक्षकारांनी नियमाप्रमाणे जागेच्या खरेदी-विक्रीचे दस्तऐवज तयार करून हिंगणा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केले.या जागेच्या पक्क्या विक्रीपत्र नाेंदणीसाठी अलका फेंडरने त्यांना २० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नाेंदविली. ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची शहानिशा केली. तक्रारीत तथ्य आढळून येताच त्यांनी गुरुवारी दुपारी हिंगणा येथील दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात सापळा रचला. दुसरीकडे तडजाेड करून या कामासाठी २० हजार रुपयांऐवजी १५ हजार रुपये घेण्यास फेंडरने सहमती दर्शविली. ही रक्कम स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या कर्मचाऱ्यांनी अलका फेंडर हिला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले व अटक केली. तिच्या विराेधात हिंगणा पाेलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदविण्यात आला.

या कारवाईमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई एसीबीच्या पाेलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, एसीबीचे अप्पर पाेलीस अधीक्षक मिलिंद ताेतरे यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या पाेलीस निरीक्षक संजीवनी थाेरात, हवालदार प्रवीण पडाेळे, शिपाई सराेज बुधे, रेखा यादव, गीता चाैधरी, प्रिया नेवरे, सिरसाट यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरण