शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

डेबिट कार्डची माहिती घेऊन अख्ख्या परिवारातील सदस्याचे बँक खाते साफ केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 11:17 IST

स्वत:ला फायनान्स कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून एका विद्यार्थ्याकडून डेबिट कार्डचे डिटेल्स विचारल्यानंतर एका सायबर गुन्हेगाराने तो विद्यार्थी, त्याचे आई-वडील आणि भावाच्या खात्यातून तब्बल ७ लाख ४४ हजार ७८५ रुपये लंपास केले.

ठळक मुद्देसायबर गुन्हेगाराचे कुकृत्यअंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:ला फायनान्स कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून एका विद्यार्थ्याकडून डेबिट कार्डचे डिटेल्स विचारल्यानंतर एका सायबर गुन्हेगाराने तो विद्यार्थी, त्याचे आई-वडील आणि भावाच्या खात्यातून तब्बल ७ लाख ४४ हजार ७८५ रुपये लंपास केले. १९ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर अंबाझरी पोलिसांनी सोमवारी आयटी अ‍ॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.अमेय प्रशांत देवगुप्ता (वय २२) असे तक्रार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो शिक्षण घेत आहे. अंबाझरीतील वर्मा ले-आऊटमध्ये राहणाऱ्या अमेयच्या मोबाईलवर १९ सप्टेंबर २०१९ ला सुमितकुमार अग्रवाल नामक आरोपीचा फोन आला. मी बजाज फायनान्स कंपनीकडून बोलतो. माझे नाव सुमित कुमार अग्रवाल असून तुमच्या लॅपटॉपची ४,३०३ रुपयांची किस्त बाकी आहे. ती तातडीने जमा करा अन्यथा तुम्हाला व्याज भरावे लागेल, असा धाक दाखवून आरोपीने अमेयला त्याच्या डेबिट कार्डचे डिटेल्स विचारले. त्यानंतर त्या डेबिट कार्डच्या आधारे अमेयचे वडील प्रशांत गुप्ता, आई श्रीवल्ली देवगुप्ता आणि भाऊ साईअक्षय देवगुप्ता यांच्या बँक खात्यातून ७ लाख ४४ हजार ७७५ रुपये काढून घेतले. ही खळबळजनक बाब लक्षात आल्यानंतर देवगुप्ता परिवाराने पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरण सायबर शाखेत गेले. सायबर शाखेने प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर अंबाझरी पोलिसांकडे सोमवारी प्रकरण सोपविले.सहायक पोलीस निरीक्षक अरविंद घोडके यांनी सोमवारी अमेयची तक्रार नोंदवून घेतली आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचा दुरूपयोग केल्याच्या कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.भविष्यातील योजनांवर पाणीअमेयचे वडील प्रशांत गुप्ता शासकीय नोकरदार होते. ते काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतील पाच लाख रुपये आपल्या स्वत:च्या खात्यात ठेवले. दोन लाख रुपये पत्नीच्या खात्यात टाकले तर दोन मुलांच्या खात्यात ४४ हजार रुपये जमा केले. या रकमेतून भविष्यातील योजनांची पूर्तता करण्याचे त्यांचे स्वप्न होते. अमेयच्या लहानशा चुकीमुळे या परिवारातील सर्व सदस्यांच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने रक्कम लंपास करून त्यांच्या योजनांवर पाणी फेरले आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम