शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नागपूर रेल्वेस्थानकावर उपाशीपोटी कर्मचाऱ्यांचे सफाई अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:00 PM

रेल्वे प्रशासन रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानकावर स्वच्छता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु कंत्राटीकरणाच्या धोरणामुळे नागपूर रेल्वेस्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना मागील अडीच महिन्यांपासून उपाशीपोटी राहून सफाईचे अभियान राबविण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्देवेतन रखडले : दीड महिन्याचे वेतन बुडवून जुना कंत्राटदार पळाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे प्रशासन रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानकावर स्वच्छता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. परंतु कंत्राटीकरणाच्या धोरणामुळे नागपूर रेल्वेस्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांना मागील अडीच महिन्यांपासून उपाशीपोटी राहून सफाईचे अभियान राबविण्याची पाळी आली आहे. जुना कंत्राटदार दीड महिन्याचे वेतन बुडवून पळाला असून नव्या कंत्राटदारानेही चालू महिन्याचे वेतन न दिल्यामुळे सफाई कर्मचारी अडचणीत आले आहेत.नागपूर रेल्वेस्थानकावर १५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत सफाईचे कंत्राट एस. के. वली नावाच्या कंत्राटदाराला देण्यात आले होते. परंतु या कंत्राटदाराने सफाई कर्मचाऱ्यांचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे असे मिळून दीड महिन्याचे वेतन न देताच पळ काढला. त्यानंतर सफाईचे कंत्राट कोटेशननुसार दुबे नावाच्या व्यक्तीला देण्यात आले. त्यानेही सफाई कर्मचाºयांच्या वेतनाची तारीख १० मार्च असताना १५ मार्च अखेर वेतन दिलेले नाही. यामुळे रेल्वेस्थानकावरील सफाई कर्मचारी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे. उपाशीपोटी रेल्वेस्थानकाची सफाई त्यांना करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेची जबाबदारी कंत्राटदारांच्या हाती सोपविल्यापासून सातत्याने सफाई कर्मचाऱ्यांना केलेल्या कामाचे वेतन मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आता तर अडीच महिन्याचे वेतन रखडल्यामुळे जगण्याचा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या नेहमीच्या कटकटीतून कायमचा तोडगा काढून सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सफाई कर्मचारी करीत आहेत.‘पुढील आठवड्यात वेतन देऊ’जुन्या कंत्राटदाराने सफाई कर्मचाऱ्यांचे दीड महिन्याचे वेतन दिलेले नाही. सफाई कर्मचाऱ्यांची अडचण आम्ही समजु शकतो. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही रेल्वेच्यावतीने पुढील आठवड्यापर्यंत त्यांचे रखडलेले वेतन देऊ. ही रक्कम संबंधित कंत्राटदाराच्या अनामत रक्कमेतून वसूल करण्यात येईल.’-कुश किशोर मिश्र, ‘सिनिअर डीसीएम’, मध्य रेल्वे, नागपूर विभागआरोग्य निरीक्षकाची अरेरावीआधीच वेतनामुळे त्रस्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना रेल्वेस्थानकावरील आरोग्य निरीक्षक श्रद्धा देशपांडे या नाहक त्रास देत असल्याची माहिती सफाई कर्मचाऱ्यांनी दिली. सफाई कर्मचाºयांना काढून टाकण्याची धमकी देणे, कंत्राटदाराकडे खोट्या तक्रारी करणे असे उपद्याप या आरोग्य निरीक्षकाने चालविले असून याला आम्ही कंटाळलो आहोत, अशा शब्दात सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरagitationआंदोलन