शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प खर्चात शुद्ध पाणीपुरवठा; नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये यशस्वी प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 10:55 IST

येणीकोणी (ता. नरखेड) येथील तरुण सरपंच मनीष फुके यांच्या संकल्पनेतून अत्यल्प खर्चात गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर उपयोग करण्यात आला.

ठळक मुद्देयेणीकोणी येथे फिल्टर मीडियाचा वापरपाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या गावात आता मुबलक पाणी

श्याम नाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येणीकोणी (ता. नरखेड) येथील तरुण सरपंच मनीष फुके यांच्या संकल्पनेतून अत्यल्प खर्चात गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर उपयोग करण्यात आला. एवढेच काय तर गावातील सांडपाण्याचा उपयोग बगीचा फुलविण्यासाठी करण्यात येत आहे.गाव स्वच्छ, सुंदर आणि सर्वच बाबतीत स्वयंसिद्ध असावे, या ध्येयाने मनीष फुके यांना स्वस्थ बसू दिले नाही. त्यातूनच शहराप्रमाणे गावातील नागरिकांनाही शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी निर्धार केला. पाहता पाहता त्यांच्या कार्याला अखेर यश आले. या उपक्रमांतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पाण्याची पातळी खाली गेलेल्या तलावामधून एक नाली खोदून त्याद्वारे पाणी विहिरीत घेण्यात येऊन पाणी स्थिर करण्यात आले. त्याच विहिरीच्या बाजूला दुसरी विहीर तयार करून त्यामध्ये बारीक रेती, लहान दगड (गिट्टी), मोठे दगड टाकून त्याद्वारे पाणी शुद्ध करण्यासाठी ‘फिल्टर मीडिया’चा वापर करण्यात आला. ‘फिल्टर मीडिया’द्वारे पाणी हे नैगर्गिकरीत्या शुद्ध होत असून, ते शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळत आहे. फिल्टर मीडिया विहिरीमध्ये जवळपास २६ फूट खोलीवरून पाईपद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सोडण्यात येते.यामध्ये पाणी शुद्धीकरण संयंत्रणेपेक्षा कितीतरी पटीने कमी खर्च या उपक्रमावर झाला.

पिंपळगावमधून सिंचन व्यवस्थागावाजवळील पिंपळगाव तलावामधून शेतकऱ्यांना ओलिताची सोय व्हावी यासाठी वेगवेगळी नाली न करता एकच नाली तयार करण्यात आली. त्यासाठी सामूहिकरीत्या पाईपलाईन टाकली. या नालीमुळे पाण्याचा निचरा कमी होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च होण्यापासून त्यांनी वाचवले. वर्षभरापर्यंत या गावात पाणीटंचाई असताना आता गावात पाण्याची मुबलकता आहे.

टॅग्स :Waterपाणी