शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

‘अभिजात मराठी’ हे विजयानंतरचे पहिले लक्ष्य; लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 09:45 IST

माझ्या संमेलनाध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कार्यकाळात मी विशेष प्रयत्न करणार असून ‘अभिजात मराठी’ हेच माझे पहिले लक्ष्य राहणार आहे, अशा शब्दात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या भावी संमेलनाध्यक्षपदाच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली.

ठळक मुद्देसंमेलनाध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर लोकमतला विशेष मुलाखत

शफी पठाण।आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती आज वाईट आहे हे वास्तव आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर या भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून विशेष अनुदान मिळेल. त्यातून बरेच काही चांगले उपक्रम राबवता येतील. त्यामुळे माझ्या संमेलनाध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कार्यकाळात मी विशेष प्रयत्न करणार असून ‘अभिजात मराठी’ हेच माझे पहिले लक्ष्य राहणार आहे, अशा शब्दात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या भावी संमेलनाध्यक्षपदाच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली.संमेलनाध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर लोकमतला त्यांनी विशेष मुलाखत दिली. देशमुख म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेत अभिजात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली.या समितीने मराठी भाषेचे संशोधन व सूक्ष्म अभ्यास करून मराठी कशी अभिजात आहे, याचे पुरावे संबंधित विभागाला सादर केले आहेत. मी लवकरच प्रा. रंगनाथ पठारे यांना भेटून चर्चा करणार असून त्यानंतर दिल्लीत पाठपुरावा सुरू करणार आहे. याविषयी प्रसंगी आंदोलनाचीही माझी तयारी आहे. मराठी ही ज्ञानभाषा व व्यवहार भाषा झाली पाहिजे, हा माझा आग्रह आहे. त्यासाठी बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणे आवश्यक आहे. यासाठीही मी संमेलनाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र शासनाला विनंती करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.मराठी विद्यापीठ व संतपीठासाठी विशेष प्रयत्नमराठी विद्यापीठाची मागणी जुनीच आहे. हे विद्यापीठ मराठीचे आद्यकवी मुंकुदराज स्वामींच्या अंबेजोगाई या गावी व्हावे, असाही एक मतप्रवाह आहे. पण, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. यासोबतच पैठणला संतपीठ व्हावे, यासाठी शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. तो विषयही प्रलंबित आहे. याकडे मी संमेलनाध्यक्षाच्या पदावरून शासनाचे लक्ष वेधणार आहे.

जय-पराजय नव्हे कार्य महत्त्वाचेसाहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले. जो निकाल आला तो मला मान्य आहे. शेवटी जय-पराजय नव्हे तर वाङ्मयीन कार्य महत्त्वाचे आहे. मला मिळालेली मते ही माझ्या चाहत्यांनी माझ्या लेखणीला दिलेली पावती आहे. मी त्या सर्वांचे आभार मानतो. विजयी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो. विदर्भ साहित्य संघाचे विशेष ऋण मानतो. या निवडणुकीच्या निमित्ताने एक सांगायचे आहे. मागच्या काही वर्षात मतांचा निश्चित कोटा पूर्ण करता निवडून येण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा निवडीचा वेगळ्या दृष्टीने विचार करण्याचीही गरज निर्माण झाली आहे.-डॉ. रवींद्र शोभणे

अमूर्त जगाशी परिचय करून दिल्याबद्दल धन्यवादमी ही निवडणूक केवळ लढण्यासाठी नव्हे तर सारस्वतांच्या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या अनैतिक आणि स्खलनशील परंपरेचा अंत व्हावा यासाठी लढलो. यासाठी जवळपास एक वर्ष झटलो. निवडणुकीची लोकशाहीप्रणित साधनशुचिता निष्ठेने पाळूनच मी बृहन्महाराष्ट्रातील व महाराष्ट्रातील गावोगावी साहित्यिक मित्रांशी भेटलो. त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीने साहित्य संस्थांच्या अमूर्त जगाशी परिचय करून दिल्याबद्दल, त्याबद्दल मला सहकार्य करणाºया सर्वांचेच मनस्वी धन्यवाद.-डॉ. किशोर सानप

संमेलनासाठी एक कोटीची मागणी योग्यचजागतिक तामीळ महोत्सवासाठी तामिळनाडू सरकारने ३०० कोटींचा खर्र्च केला. कानडी साहित्य संमेलनासाठी कर्नाटक सरकारने आठ कोटी रुपये दिल्याचे उदाहरणही ताजेच आहे. आपले राज्य सरकार मात्र खूप कद्रुपणा करीत आहे. आजच्या महागाईच्या काळात २५ लाखांच्या अनुदानात काहीच होत नाही. म्हणून साहित्य महामंडळ संमेलनासाठी जी एक कोटीची मागणी करीत आहे तिचे मी समर्थन करतो.

अध्यक्षीय भाषणासाठी ऐकणार ‘मन की बात’माझ्या अध्यक्षीय भाषणात कुठल्या-कुठल्या विषयाला स्पर्श केला जावा, मतदारांना व मराठी जनांना याबाबत काय वाटते, हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी मी लवकरच काहींना पत्र पाठवून त्यांच्या अपेक्षा, सूचना जाणून घेणार आहे. त्या अपेक्षा, सूचनांचा अध्यक्षीय भाषणात समावेशही करणार आहे. बडोदा ही पुरोगामी राजे सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी आहे. या शहरात होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद मला लाभले हे मी माझे सौभाग्य समजतो. सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार. मी कार्यर्ता होतो, यापुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.

 

टॅग्स :marathiमराठी