शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फ विधेयकाविरोधात आंदोलनावेळी हिंसाचार; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या...
2
धक्कादायक बातमी! शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकर्‍यापैकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, कुणाचा हलगर्जीपणा?
3
“मुंबईत मराठी आले पाहिजे हे ठीक, पण आम्ही राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही”: रामदास आठवले
4
"बाबर आझम रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर पडायचा अन्..."; मुलाखतीत समोर आली मोठी माहिती
5
पेन्शनरांची बल्ले बल्ले! थोडा जरी विलंब झाला तरी त्यावर बँका ८ टक्के व्याज देणार, RBI चा नवा नियम
6
भाजपाचं 'ऑपरेशन कमळ'! रातोरात बैठक अन् राम शिंदेंनी रोहित पवारांना दिला मोठा धक्का
7
“...तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान झाले असते”: रामदास आठवले
8
हुथी बंडखोरांवर अमेरिकेचा कहर सुरूच, येमेनच्या राजधानीत जोरदार हवाई हल्ले
9
"पुरुष अधिकाऱ्यानं केली शारीरिक तपासणी, ८ तास टॉयलेटलाही जायला दिलं नाही"
10
मराठी वि. हिंदीची धग इंग्रजीपर्यंत जाऊन पोहोचली; डोंबिवलीत वाद, तीन तरूणींना मारहाण
11
PL 2025 KKR vs LSG : ईडन गार्डन्सच्या मैदानात घोंगावलं निकोलस पूरन अन् मिचेल मार्श नावाचं वादळ
12
“लोकांना आता आपल्या शिवसेनेची गरज, परत कोकण पादाक्रांत करणार, कोण मधे येतो बघू”: उद्धव ठाकरे
13
दाऊदच्या भीतीमुळे बॉलिवूड सोडलं? गेल्या ३७ वर्षांपासून अभिनेत्री आहे गायब, नक्की कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही
14
'राजकीय इनिंग'साठी भाजपाचीच निवड का केली? केदार जाधव म्हणाला- "छत्रपती शिवाजी महाराजांना..."
15
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे ९ मोठे निर्णय; वाळू-रेती धोरण, सिंधी समाजासाठी अभय योजना!
16
एका ट्विटमुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ! गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
17
मोठी बातमी! वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत; पंढरपुरातील चाचणी यशस्वी
18
दिशा सालियानच्या वकिलाची न्यायमूर्तींवर वादग्रस्त टिप्पणी; अवमान केल्याप्रकरणी हायकोर्टाने सुरु केली कारवाई
19
जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात १७ वर्षांनंतर न्याय, ४ दहशतवाद्यांना जन्मठेप; झाला होता ७१ जणांचा मृत्यू
20
भारीच! लग्नासाठी महागडे कपडे मोफत देणारी 'ड्रेस बँक'; एका टॅक्सी ड्रायव्हरची भन्नाट कल्पना

कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या आधारे निवृत्ती लाभात वाटा मागणे अयोग्य : उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 10:53 IST

हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु, या मुद्द्यावर कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाऊ शकत नाही. त्यासाठी योग्य मंचामध्ये योग्य ती कार्यवाही करून निर्णय घेणे गरजेचे आहे, याकडेही न्यायालयाने आवर्जून लक्ष वेधले.

राकेश घानोडे

नागपूर : पत्नी कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या आधारे पतीच्या निवृत्ती लाभात वाटा मागू शकत नाही. या मागणीकरिता हा कायदा लागू होत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

विभक्त पत्नीची पतीच्या निवृत्ती लाभामधील वाटा मिळण्याची पात्रता निर्धारित करणे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु, या मुद्द्यावर कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत कार्यवाही केली जाऊ शकत नाही. त्यासाठी योग्य मंचामध्ये योग्य ती कार्यवाही करून निर्णय घेणे गरजेचे आहे, याकडेही न्यायालयाने आवर्जून लक्ष वेधले.

१९६९ मध्ये लग्न, २००४ मध्ये विभक्त

प्रकरणातील पती वेकोलि कर्मचारी होता. तो डिसेंबर-२०१४ मध्ये सेवानिवृत्त झाला. या दाम्पत्याचे १९६९ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर मतभेद वाढल्यामुळे ते २००४ मध्ये विभक्त झाले. दरम्यान, पत्नीने पतीकडून खावटी मिळविण्यासाठी २००५ मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १२५ अंतर्गत प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या न्यायालयाने २०१२ मध्ये तो अर्ज मंजूर करून पत्नीला मासिक दोन हजार रुपये खावटी मंजूर केली आहे. पतीने ही रक्कम अदा करण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय, परिस्थितीनुसार खावटीत वाढ करण्याचा मार्ग पत्नीकरिता मोकळा आहे.

- तर कायदेशीर प्रक्रियेचा दुरूपयोग

पत्नीचा वादग्रस्त अर्ज कायम ठेवल्यास कायदेशीर प्रक्रियेचा दुरूपयोग होईल, असेदेखील न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ठळकपणे नमूद केले. पत्नीने पतीपासून विभक्त झाल्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे २०१४ मध्ये वादग्रस्त अर्ज दाखल केला होता. तिने या विलंबाचे कारण स्पष्ट केले नाही, तसेच तिच्या अर्जात कौटुंबिक हिंसाचाराच्या विशिष्ट प्रसंगाचा उल्लेख नव्हता. सर्व आरोप मोघम व वरवर केलेले होते. तिने या कायद्यानुसार मिळणाऱ्या इतर लाभांची मागणी केली नव्हती. केवळ निवृत्ती लाभात वाट मिळण्यावर भर दिला होता.

टॅग्स :Courtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारDivorceघटस्फोट