शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सीजेएम न्यायालयातून फडणवीसांना तात्पुरता दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 20:37 IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी मुख्य न्याय दंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयातून तात्पुरता दिलासा मिळाला. न्यायालयाने अ‍ॅड. सतीश उके यांच्या तक्रारीवर २४ जानेवारीपर्यंत सुनावणी स्थगित केली.

ठळक मुद्देतक्रारीवर २४ जानेवारीला पुढील सुनावणी न्यायालयात उपस्थित राहावे लागेल,सूट मिळणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी मुख्य न्याय दंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयातून तात्पुरता दिलासा मिळाला. न्यायालयाने अ‍ॅड. सतीश उके यांच्या तक्रारीवर २४ जानेवारीपर्यंत सुनावणी स्थगित केली. तसेच पुढच्या सुनावणीदरम्यान फडणवीस यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागेल. त्यांना कुठलीही सूट मिळणार नाही, असे आदेशही दिले.अ‍ॅड. उके यांनी तक्रारीत म्हटले आहे की, फडणवीस यांनी वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्जासोबतच त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात दोन विचाराधीन फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही. त्यांनी असे जाणीवपूर्वक केले. त्यामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी. शनिवारी या तक्रारीवर सुनावणी दरम्यान फडणवीस यांच्यातर्फे अर्ज सादर करण्यात आला. यात आज प्रत्यक्षपणे उपस्थित राहण्यापासून सूट देण्याची विनंती करण्यात आली होती. यासाठी असे कारण सांगण्यात आले होते की, काही दिवसांपूर्वी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ते शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे ते न्यायालयात उपस्थित राहण्यास असमर्थ आहेत. त्यांनी न्यायालयाला मुदत देण्याची विनंती केली. त्यांच्या अर्जावर उके यांच्याकडून विरोध करण्यात आला. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने फडणवीस यांचा अर्ज मंजूर करीत त्यांना मुदत दिली. तसेच ‘पुढच्या सुनावणी दरम्यान त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल, असेही आपल्या आदेशात स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCourtन्यायालयnagpurनागपूर