अनधिकृत आठवडी बाजारामुळे नागरिक बेजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:33+5:302021-06-22T04:06:33+5:30

मनपाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात : नवीन बाजारांची निर्मिती नाही गणेश हूड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराची स्मार्ट सिटीच्या ...

Citizens bored due to unauthorized weekly market! | अनधिकृत आठवडी बाजारामुळे नागरिक बेजार!

अनधिकृत आठवडी बाजारामुळे नागरिक बेजार!

Next

मनपाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात : नवीन बाजारांची निर्मिती नाही

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शहरातील नागरिकांना स्मार्ट मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा स्मार्ट सिटीचा मूळ हेतू आहे. विकास प्रकल्पासोबतच शहराचा पसारा वाढत आहे. अनधिकृत ले-आउटच्या माध्यमातून शहराचा चोहोबाजूंनी विस्तार होत आहे. ३० लाखांहून लोकसंख्येची गरज लक्षात घेता किमान एक लाख लोकसंख्येमागे एक आठवडी बाजार अपेक्षित आहे. मात्र महापालिका प्रशासनाने मागील दशकात नवीन आठवडी बाजार निर्माणच केले नाही. परिणामी शहराच्या विविध भागात नवे नवे अनधिकृत आठवडी व दैनंदिन बाजार भरत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. यातून गंभीर समस्या निर्माण होत आहेत. शहरात अधिकृत दहा आठवडी बाजार व ६ दैनिक बाजार आहेत. याव्यतिरिक्त अनधिकृतपणे २३ ठिकाणी आठवडी बाजार व २० ठिकाणी दैनिक बाजार भरतो. फुटपाथवर भरणारे बाजार गृहीत धरले तर ही संख्या शंभराहून अधिक होते. बाजार ही नागरिकांची गरज आहे. त्यामुळे नागरिकांची सोय होते. मात्र, रस्त्यांवर भरणाऱ्या अनधिकृत बाजारांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

रस्त्यांवर भरणाऱ्या अनधिकृत बाजारांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. चारचाकी वाहतूक तर जवळपास बंद होते. शहर बसच्या फेऱ्या होत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. बाजार संपल्यानंतर बहुतांश ठिकाणी सडका भाजीपाला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पडून राहतो. मटन विक्रेते मांसाचे तुकडे उघड्यावर फेकून देतात. याची दुर्गंधी पसरते. परिसरातील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.

.....

बाजारांना मैदानात जागा उपलब्ध करा

फेकलेला भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरांची गर्दी जमते. जनावरांची झुंज होते. यामुळे अपघात होतात. सोयीसाठी भरविल्या जाणाऱ्या या बाजारांमुळे नागरिकांची गैरसोय होते. महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. नागरिकांची बाजाराची गरज व अनधिकृत बाजारांमुळे होणारी गैरसोय विचारात घेता महापालिकेने संबंधित रस्त्यांवरील अनधिकृत बाजार मैदानांमध्ये स्थानांतरित करण्याची गरज आहे. यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

....

बाजार ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. ते असायलाच हवे. नागपूर शहराची लोकसंख्या विचारात घेता किमान ३० आठवडी बाजार असायला हवे. परंतु मॉल उभारण्याला प्राधान्य असलेल्या मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने अनधिकृत बाजार भरतात. यामुळे मनपाचा महसूलही बुडतो. याबाबत धोरणात्मक निर्णय होण्याची गरज आहे.

प्रफुल्ल गुडधे, नगरसेवक

....

- बाजार ही गजर; पण गैरसोय होऊ नये

- बाजारामुळे वाहतुकीला अडथळा

- चारचाकी वाहतूक होते बंद

- परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास

- स्टार बसच्या फेऱ्या दुपारनंतर होतात बंद

- दुसऱ्या दिवशी सडका भाजीपाला पडून राहतो

- मोकाट जनावरांची गर्दी होते.

....

अधिकृत आठवडी बाजार

ठिकाण दिवस

नेताजी मार्केट, सीताबर्डीसोमवार, गुरुवार

सुपर मार्केट मागे - सोमवार, गुरुवार

गोकुळपेठ मार्केट- मंगळवार, शुक्रवार

मंगळवारी सदर - मंगळवार, शुक्रवार

सोमवारी पेठ - बुधवार

बुधवारा मार्केट महाल - बुधवार

कमाल चौक - शनिवार

महात्मा फुले मार्केट - शनिवार

लकडगंज - रविवार

इतवारा बाजार - रविवार

.....

अनधिकृत आठवडी बाजार-

जयताळा - रविवार,पारडी- रविवार

सोनेगाव - रविवार हिवरीनगर- गुरुवार

सीतानगर - शनिवारहुडको कॉलनी - मंगळवार

फेरेण्ड्स कॉलनी- बुधवारपिवळी नदी -रविवार

उदयनगर रिंग रोड - शनिवार टिपू सुलतान चौक -सोमवार

ढगे बंगला- मंगळवारकबीर नगर- शनिवार

मानेवाडा - बुधवारकपिलनगर- बुधवार

शताब्दी चौक - सोमवारयशोधरा नगर -गुरुवार

रमना मारोती -शनिवारपेन्शन नगर -रविवार

हसन बाग- सोमवार कावरापेठ- बुधवार

विनोबा भावे नगर - शनिवारशांतीनगर -सोमवार

वाठोडा- गुरुवार

............

दैनिक बाजार

अधिकृत अनधिकृत

सोमवारी पेठ खामला सहकारनगर घाटाजवळ

म.फुले बाजार गोपालनगर, सुरेंद्रगढ

दही बाजार जगनाडे चौक,

बांगलादेश आशीर्वादनगर, आयचित मंदिर

इतवारा पूल ओळ बस स्टॉप, घाट रोड, नटराज टॉकीज रोड

कमाल टॉकीज भारत माता चौक, जागनाथ बुधवारी,

पाचपावली पुलाखाली, पारडी, डिप्टी सिग्नल

सतनामी नगर, राणी दुर्गावती नगर,

गिट्टीखदान, मानकापूर, जाफरनगर

..........

Web Title: Citizens bored due to unauthorized weekly market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.