शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात किटअभावी सिरो सर्वेक्षण ठप्प : २४०० लोकांची होणार होती तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 21:33 IST

नकळत किती लोकांना कोरोना होऊन गेला होता, याची माहिती घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यात अ‍ॅन्टीबॉडीज चाचणी म्हणजे ‘सिरो सर्वेक्षण’ला सुरुवात झाली, परंतु किटअभावी ही चाचणीच ठप्प पडली. साधारण २४०० लोकांची चाचणी होणार होती.

ठळक मुद्देनकळत किती लोकांना कोरोना होऊन गेला याची होणार होती माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नकळत किती लोकांना कोरोना होऊन गेला होता, याची माहिती घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यात अ‍ॅन्टीबॉडीज चाचणी म्हणजे ‘सिरो सर्वेक्षण’ला सुरुवात झाली, परंतु किटअभावी ही चाचणीच ठप्प पडली. साधारण २४०० लोकांची चाचणी होणार होती, जुलै महिन्यापर्यंत सुमारे १२०० लोकांची चाचणी झाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, अनेक मोठ्या शहरांमधील या चाचणीचे निष्कर्ष येऊ लागले असताना उपराजधानीतील चाचणीच बंद पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्यांना लक्षणे नाहीत परंतु कोविड होऊन गेलेला आहे, अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये कोविड अ‍ॅन्डीबॉडीज असतात. याला वैद्यकीय भाषेत ‘क्लिनिकल इन्फेक्शन’ म्हणतात, असे किती लोक असावेत याचा अंदाज घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील निवडक लोकांची चाचणी केली जाणार होती. यात नागपूर जिल्ह्यातील १३ तालुके व महानगरपालिकेच्या १० झोनचा समावेश करण्यात आला होता. मनपा झोन व तालुक्यामधील सामान्य वसाहतीतील १४०० लोकांच्या चाचण्या केल्या जाणार होत्या. कन्टेन्मेंट झोनमधील ६०० लोकांच्या तर ४०० चाचण्या हायरिस्क लोकांमधून घेतल्या जाणार होत्या. यात कोविड रुग्णांच्या सेवेत असणारे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, मनपा कर्मचारी, पोलीस व पत्रकारांचा समावेश होता. संपूर्ण चाचण्यांच्या अहवालावरून नागपूर जिल्ह्यात कोविडचा इन्फेक्शनचा दर किती आहे, याचा निष्कर्ष काढला जाणार होता. या चाचणीला जुलै महिन्यात सुरुवात झाली. परंतु दरम्यानच्या काळात तपासणीच्या किटचा तुटवडा पडल्याने सध्या ही चाचणी बंद असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. मात्र या विषयी कुणी अधिकृत बोलण्यास तयार नाही. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने या चाचणीचा अंतिम अहवाल तयार करण्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पीएसएम विभागाची होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर