शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेशीमबाग मैदानावर सर्कसला परवानगी देणे शेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:14 IST

रेशीमबाग मैदानावर सर्कस आयोजित करण्याची परवानगी दिल्यामुळे दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाची शेकली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रेशीमबाग मैदान दुरुपयोगाच्या प्रकरणात विद्यालयाला प्रतिवादी करण्यास सांगितले. तसेच, विद्यालयाला नोटीस बजावून संस्थेचे सचिव किंवा अध्यक्षाने २७ जून रोजी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, असा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दणका : दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाला केले प्रतिवादी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीमबाग मैदानावर सर्कस आयोजित करण्याची परवानगी दिल्यामुळे दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाची शेकली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रेशीमबाग मैदान दुरुपयोगाच्या प्रकरणात विद्यालयाला प्रतिवादी करण्यास सांगितले. तसेच, विद्यालयाला नोटीस बजावून संस्थेचे सचिव किंवा अध्यक्षाने २७ जून रोजी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, असा आदेश दिला.नागपूर सुधार प्रन्यासने रेशीमबाग मैदानाचा एक भाग दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाला खेळाकरिता वापरण्यासाठी दिला आहे. गेल्या २८ मे रोजी विद्यालयाने या भागावर ३ जून ते १६ जुलैपर्यंत म्हणजे ४३ दिवसाकरिता सर्कस आयोजित करण्याची परवानगी दिली होती. गेल्या ६ जून रोजी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने नासुप्र व मनपाला यावर स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर हे प्रकरण अंगलट येणार याची जाणीव झाल्यामुळे विद्यालयाने त्याच दिवशी सर्कसची परवानगी रद्द केली. त्यानंतरही न्यायालयाने विद्यालयाला दणका दिला.नागपूर सुधार प्रन्यासच्यावतीने कार्यकारी अधिकारी संजय पोहेकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाला स्पष्टीकरण दिले. त्यानुसार, नासुप्रनेही ८ जून रोजी विद्यालयाला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. विद्यालयाला सुनावणीची संधी दिल्यानंतर आवश्यक आदेश जारी केला जाणार आहे. महापालिकेच्यावतीने अतिरिक्त उपाआयुक्त राजेश मोहिते यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून मनपाच्या आरोग्य व अग्निशमन विभागांनी सर्कसला ना हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते अशी माहिती दिली. यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असून अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर हे यात न्यायालय मित्र आहेत. मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.क्रीडा संकुल लग्नासाठी नाहीमानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल आतापर्यंत कधीच लग्न समारंभ व अन्य कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात आले नाही. हे संकुल केवळ क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी भाड्याने दिले जाते अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी न्यायालयाला दिली. तसेच, क्रीडा उपसंचालकांचे यासंदर्भातील १२ जूनचे पत्र न्यायालयात सादर केले.

टॅग्स :nagpurनागपूर