शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तरुणाच्या हत्येचा सिनेस्टाईल प्रयत्न :पिस्तूल, चॉपर आणि रॉडचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 01:59 IST

दोन गटात सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाच्या सिनेस्टाईल हत्येच्या प्रयत्नात झाले. एका गटाने पिस्तूल चॉपर आणि रॉड घेऊन तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या गटातील महिला वेळीच त्याच्या मदतीला धावल्याने तो बचावला.

ठळक मुद्देमहिलाही धावल्याबजाजनगरात मध्यरात्री तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन गटात सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाच्या सिनेस्टाईल हत्येच्या प्रयत्नात झाले. एका गटाने पिस्तूल चॉपर आणि रॉड घेऊन तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या गटातील महिला वेळीच त्याच्या मदतीला धावल्याने तो बचावला. गुरुवारी रात्री उशीरा ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हाती आलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या तरुणांच्या दोन गटात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यांच्यात अधून मधून हाणामारी आणि बाचाबाचीही होत असते. आज रात्री १० ते ११ च्या सुमारास तरुणाला एकटे पाहून दुसऱ्या गटातील तरुणांनी चॉपर, पिस्तूल आणि रॉड तसेच लाठी घेऊन त्याला घेरले. ते त्याच्यावर हल्ला चढविण्याच्या  प्रयत्नात असतानाच त्याच्या मदतीला त्याच्या गटातील महिला धावल्या. त्यांनी त्याला सुरक्षित ठिकाणी नेले. हल्ल्यात त्याला दुखापत झाली. मात्र तो बचावला. विशेष म्हणजे, या हल्ल्यात काही महिलांचाही सहभाग असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच बजाज नगर ठाण्याचे पोलिस पथक तिकडे धावले. तोपर्यंत त्या भागात स्फोटक स्थिती होती. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन मध्यरात्री ठाण्यात आणले. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यातून घटनाक्रम जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत होते. या घटनेची माहिती कळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बजाजनगर ठाण्यात पोहोचले. शुक्रवारी पहाटे दीड वाजेपर्यंत या घटनेची माहिती जाणून घेण्याचा पोलीस अधिकारी प्रयत्न करीत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर