शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये नागपुरातील चित्रपटगृहांचा ९ कोटींवर व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 20:23 IST

मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नागपुरातील सर्व चित्रपटगृहे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. यामुळे सुमारे साडेसात ते ९ कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला असून शेकडो व्यक्ती बेरोजगार झाले आहेत. तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक लहान व्यावसायिकांचेही जगणे कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नागपुरातील सर्व चित्रपटगृहे कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद आहेत. यामुळे सुमारे साडेसात ते ९ कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला असून शेकडो व्यक्ती बेरोजगार झाले आहेत. तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक लहान व्यावसायिकांचेही जगणे कठीण झाले आहे.नागपूर शहरात १३ मार्चपासून सर्व चित्रपटगृहे बंद आहेत. शहरात ‘सिंगल स्क्रीन’सह ‘मल्टिप्लेक्स’, अत्याधुनिक व व्यावसायिक चित्रपटगृहे शहरात आहेत. या सर्व चित्रपटगृहांचा दरमहा व्यवसाय सरासरी अडीच ते ३ कोटी रुपयांच्या जवळपास असतो. या हिशेबाने मागील तीन महिन्यात साडेसात ते ९ कोटी रुपयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.चित्रपट व्यवसायातून तसेच मनोरंजन करातून सरकारच्या तिजोरीमध्ये जाणारा महसूलही या लॉकडाऊनच्या दिवसात ठप्प पडला आहे. एकूण व्यवसायाच्या १२ टक्के जीएसटी सरकारच्या तिजोरीमध्ये जात असते. मागील तीन महिन्यांपासून व्यवसाय नसल्याने हे थांबले आहे. विदर्भ, मध्यप्रदेश या भागासाठी सेंट्रल सर्किट सिने असोसिएशन कार्यरत आहे. या माध्यमातून चित्रपट व्यावसायिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहचविले आहेत. मात्र शासनाच्या निर्णयानुसार आता पुढील आदेशाची वाट पाहावीच लागणार असल्याचे मत एका चित्रपटगृह संचालकाने व्यक्त केले.शेकडोंवर लॉकडाऊनची कुऱ्हाडएका चित्रपटगृहामध्ये सरासरी १५ ते २० कर्मचारी कार्यरत असतात. या परिसरात अनेक फेरीवाले आपला व्यवसाय करतात. चहा, नाश्ता, शेंगदाणे, हातठेले अशा अनेक व्यावसायिकांची उपजीविका या व्यवसायावर असते. चित्रपटगृहात असलेल्या कॅन्टिनचाही व्यवसाय बराच मोठा असतो. नागपूर शहरातील सर्व चित्रपटगृहांची परिस्थिती लक्षात घेतली तर शेकडोंना बेरोजगार व्हावे लागले आहे.खर्च सुरुचपरिस्थिती बिकट आहे. व्यवसाय बंद असला तरी खर्च सुरूच आहे. विजेसंदर्भात सरकारने काही प्रमाणात सूट दिली असली तरी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य खर्च सुरूच आहे. ही परिस्थिती पुन्हा किती दिवस राहील याचा अंदाज नाही. चित्रपटगृहे सुरू झाल्यावरही पुढचे काही महिनेतरी प्रेक्षकांची गर्दी कमीच राहणार आहे.प्रमोदकुमार मुनोत, चित्रपटगृह संचालक

टॅग्स :Theatreनाटकnagpurनागपूर