शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाडीत सिगारेटचा धूर सोडणे आले अंगलट : १३४ जणांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:12 IST

रेल्वेगाडीत ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. मागील दहा महिन्यात रेल्वेगाडी आणि परिसरात सिगारेट ओढणाऱ्या १३४ प्रवाशांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदहा महिन्यातील आरपीएफची कारवाई

दयानंद पाईकराव/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाडीत ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा ज्वलनशील पदार्थांनी पेट घेतल्यामुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल याबाबतीत दक्ष राहते. परंतु अनेकजण याकडे दुर्लक्ष करून खुशाल रेल्वेगाडीत सिगारेट ओढतात. अशा प्रवाशांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. मागील दहा महिन्यात रेल्वेगाडी आणि परिसरात सिगारेट ओढणाऱ्या १३४ प्रवाशांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केल्याची माहिती आहे.रेल्वेच्या प्रवासात ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणे, सोबत बाळगणे हा गुन्हा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीला प्रशासनाने मनाई केली आहे. ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा दलाला देण्यात आले आहेत. रेल्वे सुरक्षा दल अशा प्रवाशांविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १६७ नुसार गुन्हा दाखल करते. परंतु अनेक प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात. ते धावत्या रेल्वेगाडीत तसेच रेल्वे परिसरात खुशाल सिगारेट ओढतात. यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे सुरक्षा दल अशा प्रवाशांविरुद्ध नेहमीच कारवाई करते. होय, जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत रेल्वे सुरक्षा दलाने सिगारेट ओढणाऱ्या १३४ प्रवाशांविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १६७ नुसार कारवाई केली आहे. यात जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारीत ५, मार्चमध्ये १४, एप्रिल २३, मे २३, जून २१, जुलै १२, ऑगस्ट १६, सप्टेबरमध्ये १८ आणि ऑक्टोबर महिन्यात ११ प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या कडून दंडापोटी २६ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. सिगारेट ओढताना पकडल्यानंतर जागीच दंड न भरणाऱ्या सहा जणांना रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. रेल्वेत सिगारेट ओढल्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे प्रवाशांनी प्रवासात सिगारेट ओढू नये, अशा प्रकारची जनजागृती वेळोवेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने करण्यात येते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.प्रवाशांनी सिगारेट ओढणे टाळावे‘रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वेत ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणे, सिगारेट ओढणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रवाशांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलातर्फे नियमितपणे कारवाई करण्यात येते. त्यामुळे प्रवाशांनी कारवाई टाळण्यासाठी प्रवासात सिगारेट ओढणे टाळण्याची गरज आहे.’भवानी शंकर नाथ, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल

टॅग्स :Smokingधूम्रपानrailwayरेल्वे