बुलडाणा : महाराष्ट्र अनुवाद परिषद आणि तुका म्हणे साहित्यिक चळवळीच्या माध्यमातून मराठी वाड:मय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठीत राज्यस्तरीय भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कार दिला जातो. भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कार २0१५ साठी महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील प्राप्त झालेल्या प्रवेशिकांमधून ६ साहित्यिकांच्या कलाकृतींची निवड करण्यात येत असल्याचे समितीच्या संयोजिका वैशाली भगवान ठग, अध्यक्ष डॉ. गणेश गायकवाड यांनी जाहीर केले. पुरस्कारप्राप्त प्रतिभावंतांमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील कु. मंजीरी भोयर, गोव्याचे प्रकाशचंद्र रामचंद्र क्षीरसागर, मुंबईचे पंढरीनाथ रेडकर, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील किसन चव्हाण, पुण्याच्या प्रतिमा इंगोले आणि जळगावचे डॉ.संजीवकुमार सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. परिक्षण समितीमध्ये डॉ.गणेश गायकवाड, वैशाली ठग, डॉ.शिवानंद भानुसे, सुरेश साबळे, शिवा उज्जैनकर, प्रा.डॉ.गोविंद गायकी, बाबुजी धिरे, रविकांत जाधव यांनी काम पाहिले. हा पुरस्कार २0११ पासून सुरू करण्यात आलेला असून, आतापर्यंत १४३ साहित्यिकांना गौरविण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रो ख रक्कम असे असून २४ जानेवारी २0१६ ला प्रसिध्द कवी, अनुवादक स्व.भगवान ठग यांच्या जन्मदिनी भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येतील, असे संयोजक व अध्यक्ष यांनी घोषित केले.
भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कारासाठी साहित्याची निवड
By admin | Updated: November 25, 2015 02:01 IST