शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ख्रिसमसचा उत्साह : चर्चमध्ये निनादले कॅरोल गीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:53 IST

शहरात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असून, प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या आनंदात शहर बुडाले आहे. चर्चसोबतच चौकाचौकात आणि घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रतिकृती तयार करून प्रभू येशूच्या जन्मप्रसंग दर्शविण्यात आला आहे.

ठळक मुद्देरोषणाईने सजले शहर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असून, प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या आनंदात शहर बुडाले आहे. चर्चसोबतच चौकाचौकात आणि घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रतिकृती तयार करून प्रभू येशूच्या जन्मप्रसंग दर्शविण्यात आला आहे. 

चर्चमध्ये कॅरोल गाणे निनादू लागली आहेत. एलआयसी चौकातील एसएफएस चर्च लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. येथील चर्चला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे. सोमवारी रात्री १० वाजता ख्रिश्चन समाजबांधव चर्चमध्ये एकत्र आले. रात्री ११ वाजता युवकांनी कॅरोल गीत सादर केले. चर्चचे फादर अल्बर्ट डिसूझा यांच्या नेतृत्वात पवित्र मिस्सा पूजा करण्यात आली. रात्री १२ वाजता केक कापण्यात आला. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. लोकांनी प्रतिकात्मक गोशाळेत प्रभू येशूला पाळण्यात झुलवले. शहरात इतर चर्चमध्येही आनंद व उत्साहाचे वातावरण होते. 
युवकांनी ‘सांताक्लॉज’ची वेशभूषा धारण केली होती.त्याचप्रकारे सेमिनही हिल्स येथील ऑल सेन्स रोजरी चर्चही आकर्षण रोषणाईने सजविण्यात आले. चर्च परिसरात दोन आकर्षण गोशाला साकारण्यात आली. चर्चचे फादर इवान रॉड्रिक्सच्या नेतृत्वात सोमवारी रात्री लुर्दमाता मंदिरात पूजा करण्यात आली. चर्चमध्ये येशूचा जन्म दिवस रात्री साजरा करण्यात आला. रात्री १२ वाजताच केक कापण्यात आला.ख्रिसमसची विशेष तयारी 
शहरातील सदर, मोहननगर, मरियमनगर, न्यू कॉलनी, नई बस्ती, मेकोसाबाग, गड्डीगोदाम, खलासी लाइन, मार्टिननगर, जरीपटका, चंदननगर, अजनी आदींसह अनेक वस्त्यांमध्ये गिटार आणि पियानोच्या संगीतावर ‘जिंगल बेल’ आणि विश यू मॅरी ख्रिसमस सारखे कॅरोल गीत सादर करण्यात आले. सजावटीच्या वस्ती आणि गिफ्ट खरेदीसाठी सोमवारी रात्री बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. ख्रिसमस ट्री, गोल्डन घंटी, लॅम्प, ग्रीटिंग कार्ड, सांताक्लॉजच्या टोप्या, कपडे, चॉकलेट बॉक्स, ड्रम आदी वस्तू खदेदीवर जोर होता. 

 

टॅग्स :Christmasनाताळnagpurनागपूर