शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करणाऱ्या चित्रा वाघ म्हणतात "मी बॅक फुटवर आलेच नाही"

By कमलेश वानखेडे | Updated: August 6, 2022 14:16 IST

चित्रा वाघ यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधला

नागपूर : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या व्हायरल व्हिडीओ ट्विट केला होता. यावर तुम्ही फॉलोअप घेतला का, असे पत्रकारांनी चित्रा वाघ यांना विचारले असता "मी बॅकफूटवर येण्याचा प्रश्नच नाही, नाना पटोले स्वतः बोलले की मी न्यायालयात जाणार आहे, तर त्यांनी जावं..." अशी प्रतिक्रिया दिली.

मंत्रालयात कोणतेही काम अडलेले नाही

राज्यात जम्बो मंत्रिमंडळ नसले तरी कुठलेही काम रखडलेले नाही. मंत्रालयात कामे करून घेण्यासाठी उलट नागरिकांची गर्दी वाढली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्देश देऊन त्यांचे प्रश्न सोडवत आहेत.मंत्रालयात  काम थांबलेले नाही. अतिवृष्टी झाली तेव्हा दोनही मंत्र्यानी बांधावर जाऊन पाहणी केली,  शेतकऱ्यांसोबत चर्चा केली, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष न्यायालय असावे

भंडारा येथे ३५ वर्षीय महिलेवर झालेल्या पाशवी अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पण पिडीतिने डॉक्टरांकडे सांगितलेल्या माहितीनुसार यात चार आरोपी आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्वरित चौथ्या आरोपीचा शोध घ्यावा व या चारही आरोपींना अत्यंत कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

गेल्या अडीच वर्षात राज्यात बलात्काराच्या अशा घटना घडल्या की त्या फास्टट्रॅक कोर्टात चालवू, असे सरकारकडून सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात राज्यात फास्टट्रॅक कोर्ट नाही. त्यामुळे अशा सर्व केसेस निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष न्यायालय असावे, अशी मागणी आपण भाजप शिवसेनेच्या युती सरकारकडे करणार असून त्याची अंमलबजावणी झालेली दिसेल, असा दावाही चित्रा वाघ यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणChitra Waghचित्रा वाघNana Patoleनाना पटोले