शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

लोकमत सखी मंचच्यावतीने ‘चिंग्स् का तडका’

By admin | Updated: June 13, 2014 01:30 IST

प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक येतो. पण प्रत्येक स्त्री सुगरण असतेच असे नाही. पण लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कायम ती आपल्या कुटुंबासाठी चविष्ट आणि रूचकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत असते असे म्हणतात.

नागपूर : प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक येतो. पण प्रत्येक स्त्री सुगरण असतेच असे नाही. पण लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कायम ती आपल्या कुटुंबासाठी चविष्ट आणि रूचकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत असते असे म्हणतात. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनापर्यंत पोचण्याचा मार्ग का पोटातून जातो नेमके हाच मंत्र समोर ठेवून प्रत्येक स्त्री संसारात आणि आपल्या स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ तयार करून कुटुंबाचे मन जिंकते. यासाठी तिला पुष्कळदा बरीच मेहनत घ्यावी लागते. प्रयत्न करावे लागते. पण तिच्या या प्रामाणिक प्रयत्नांना खमंग तडका देण्यासाठी आणि तिच्या पदार्थांना आणखी लज्जतदार बनविण्यासाठी लोकमत सखी मंच व ‘चिंग्स् का तडका’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १९ जून रोजी केले आहे. स्थानिक रजवाडा पॅलेस गांधीसागर तलाव महाल येथे हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शेफ हरपाल सिंग सोखी प्रत्यक्ष खास चिंग्स् का तडका युक्त लज्जतदार पाककृतींचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे व काही खास टिप्स सखींना देणार आहे. अशा टिप्स ज्या प्रत्येक सखींना आपल्या स्वयंपाक घरात अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. तसे स्वयंपाकघर हा प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय याच जिव्हाळ्याने आणि प्रेमाने ती रोज काहीतरी नवीन पदार्थ कुटुंबासाठी करीत असते. पण प्रत्येक वेळेला तो पदार्थ रूचकर होईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे रोज लज्जतदार चविष्ट पाककृती तयार करण्याचे आव्हान तिच्यासमोर उभे राहते त्यातल्या त्यात व्यक्ती तितक्या पाककृती याप्रमाणे प्रत्येकांच्या आवडीनुसार स्वयंपाक करणे म्हणजे फार मोठा प्रश्न. अशावेळेला ‘चिंग्स् का तडका’ या कार्यक्रमातून या सर्व प्रश्नांची उत्तरे महिलांना मिळणार आहे. अतिशय सोप्या सहज सुटसुटीत आणि लज्जतदार पाककृतींचा भरगच्च नजराणा म्हणजे चिंग्स् का तडका हा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या रेसिपींच्या माहिती पुस्तिका भाग घेणाऱ्या प्रत्येक सखीला मिळणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या ८०० सखी मंच सदस्यांना प्रत्येकी १ याप्रमाणे पासेसस वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे आणि प्रथम या प्रथम सीट मिळवा याप्रमाणे प्रवेश देण्यात येणार आहे. नि:शुल्क पासेसकरिता सखीमंच कार्यालय, लोकमत भवन, रामदासपेठ येथे ९८५०३०४०३७ - २४२९३५५, मानेवाडा ९३२३८५४५३५, प्रतापनगर (गोपालनगर) ९४२३२४०००७, महाल ९८६००४२६३५ येथे संपर्क साधावा. कार्यक्रमाला येताना सखी मंच ओळखपत्र आणणे आवश्यक.(प्रतिनिधी)