शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नोटांच्या बदल्यात दिल्या खेळण्यातल्या नोटा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:15 IST

जुन्या नोटांच्या बदल्यात कोऱ्या करकरीत नोटा देतो, अशी बतावणी करून एका व्यावसायिकाला १० हजारांचा गंडा घालणाऱ्या दोघांना जरीपटका पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देनागपुरात  व्यावसायिकाला १० हजारांचा गंडा : मध्य प्रदेशातील दोघे गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या नोटांच्या बदल्यात कोऱ्या करकरीत नोटा देतो, अशी बतावणी करून एका व्यावसायिकाला १० हजारांचा गंडा घालणाऱ्या दोघांना जरीपटका पोलिसांनी अटक केली. राजेंद्र भय्यालाल नशिने आणि हेमंत भक्ते अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते मध्यप्रदेशातील रामाकोना येथील रहिवासी आहेत.

मनोज दशरथ जरेले (वय ३५) हे जरीपटक्यातील कुशीनगरात राहतात. ते विटाभट्टी व्यावसायिक आहेत. आरोपी नशिने याने जरेले यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. आपली आरबीआय मध्ये सेटिंग असून, जुन्या नोटांच्या बदल्यात कोºया करकरीत नोटा मिळवून देऊ शकतो, असे आरोपी म्हणाला. जरेलेने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला जुन्या नोटा देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार, नशिने त्याचा साथीदार भक्तेला घेऊन शुक्रवारी दुपारी १.१५ च्या सुमारास लाल गोदामाजवळ पोहचला. पहिली भेट असल्यामुळे सॅम्पल म्हणून जरेलेने ५०० रुपयांच्या २० नोटा नशिने आणि त्याच्या साथीदाराला दिल्या. त्याबदल्यात आरोपीने १०० रुपयांच्या नोटांचे दोन बंडल जरेलेंना दिले. हे २० हजार रुपये आहे, आणखी नोटा बदलवायच्या असेल तर सीताबर्डीत भेट, असे सांगितले. आरोपी निघून गेल्यानंतर जरेलेंनी १०० च्या नोटांचे बंडल मोजण्यासाठी काढण्यासाठी आले असता वर एक १०० ची नोट आणि आतमध्ये मुलांच्या खेळण्याच्या नोटा (चिल्ड्रेन मनोरंजन बँक) असल्याचे त्यांना दिसले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने जरेलेंनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते सीताबर्डीत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, जरेलेंनी आरोपींना चलनातून बाद झालेल्या नोटा दिल्या की जीर्ण झालेल्या नोटा दिल्या, त्याबाबत पोलिसांकडून रात्रीपर्यंत विसंगत माहिती मिळत होती.लॉजमधून अटक, नोटाही जप्तपोलिसांनी सीताबर्डीच्या अपना लॉजमध्ये आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीच्या बॅगची तपासणी केली असता त्यांच्याकडे ९७ हजारांच्या नोटा आढळल्या. खेळण्याच्या नोटांचे काही बंडलही पोलिसांना आढळले. पोलिसांनी ते जप्त करून त्यांना अटक केली. आरोपींकडे ९७ हजार आढळल्यामुळे त्यांनी जरेलेंप्रमाणचे पुन्हा काही जणांची फसवणूक केली असावी, असा संशय आहे. ते शोधण्यासाठी पोलिसांनी आरोपींचा ६ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मिळवला असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNote Banनोटाबंदी