लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाइन एकपात्री अभिनय स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ऑनलाईनच पार पडला.कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या टाळेबंदीमुळे इतर क्षेत्राप्रमाणेच नाट्यक्षेत्रही कुलूपबंद झाले आहे. लहान मुलेही घरातच आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मुलांसाठी नाट्यप्रशिक्षण शिबिरे आयोजित होत असतात. मात्र, तीही होऊ शकत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुलांमधील हुरुप चेतत राहावा आणि त्यांच्यात चैतन्य निर्माण व्हावे म्हणून ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत राज्यभरातून बालकांनी सहभाग घेतला होता. स्पधेर्चा पारितोषिक वितरण सोहळा व्हॉट्सअपवरच पार पडला. प्रत्येकांनी यात सहभाग घेतला. प्रास्ताविक परिषदेचे प्रमुख कार्यवाह रोशन नंदवंशी यांनी केले. अध्यक्षस्थान बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेच्या नागपूर अध्यक्ष मधुरा गडकरी, अ.भा.मराठी नाट्यपरिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर उपस्थित होते. स्पर्धेर्च परीक्षण किशोर आयलवार, पियुष धुमकेकर, पियुष वेलंकीवार यांनी केले. संचालन रोशन नंदवंशी यांनी केले तर आभार वैदेही चवरे यांनी मानले. बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष संजय रहाटे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पार पाडली. स्पर्धेच्या आयोजनात आभा मेघे, सीमा फडणवीस, योगेश राऊत, अमोल निंबार्ते यांनी योगदान दिले.
बालरंगभूमी परिषद; ऑनलाईन पार पडला पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 09:25 IST
बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाइन एकपात्री अभिनय स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ऑनलाईनच पार पडला.
बालरंगभूमी परिषद; ऑनलाईन पार पडला पुरस्कार वितरण सोहळा
ठळक मुद्देएकपात्री नाट्यप्रयोग स्पर्धा