शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये बालशल्यक्रिया मिशन : अन्न व श्वासनलिका जुळलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:58 IST

अन्न व श्वासनलिका जुळून असलेल्या सहा महिन्यांच्या दोन बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्यात आले. या सारख्या दुर्मिळ व गुंतागुंतीच्या २५वर शस्त्रक्रियेसह आणखी १५० शस्त्रक्रिया मेडिकलच्या ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागात होऊ घातल्या आहेत. ‘बाल शल्यक्रिया मिशन’ अंतर्गत या शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आले असून सोमवारी याचे औपचारिक उद्घाटन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्दे१५० चिमुकल्यांवर होणार शस्त्रक्रिया : जर्मनी, अमेरिका व स्वित्झर्लंडमधील डॉक्टरांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व श्वासनलिका जुळून असलेल्या सहा महिन्यांच्या दोन बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्यात आले. या सारख्या दुर्मिळ व गुंतागुंतीच्या २५वर शस्त्रक्रियेसह आणखी १५० शस्त्रक्रिया मेडिकलच्या ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागात होऊ घातल्या आहेत. ‘बाल शल्यक्रिया मिशन’ अंतर्गत या शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आले असून सोमवारी याचे औपचारिक उद्घाटन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले.विदर्भातील, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अकोला आदी भागातील शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असलेल्या १५० बालरुग्णांची तपासणी करून त्यांना मेडिकलमधील ‘बालशल्यक्रिया मिशन’मध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. यात ज्या बालकांचे कुबड निघाले आहे, जन्मत:च लघवीची पिशवी नाही, अन्ननलिका तयार झाली नाही, अन्न व श्वसननलिका जुळलेली आहे, श्वसननलिकेशी फुफ्फुस न जुळता अन्ननलिकेशी जुळलेले आहे, अशा दुर्मिळातील दुर्मिळ शस्त्रक्रिया या ‘मिशन’ अंतर्गत केल्या जाणार आहेत. १८ ते २३ फेब्रुवारीपर्यंत या शस्त्रक्रिया चालणार आहे. परंतु रुग्णांची संख्या पाहता चार दिवस आधीपासून शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत विविध रोगांवरील २५ शस्त्रक्रिया झाल्या असल्याची माहिती पेडियाट्रिक सर्जरी विभागाचे डॉ. नीलेश नागदिवे यांनी ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले अमरावती जिल्ह्यातील सहा महिन्यांच्या दोन बाळांची अन्ननलिका व श्वसननलिका जुळलेली होती. यामुळे त्यांना वारंवार फुफ्फुसामध्ये ‘इन्फेक्शन’ व्हायचे. उद्घाटनानंतर या दोन्ही चिमुकल्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.तब्बल १२ वर्षांनंतर ती जेवू शकणारएका १२ वर्षाच्या मुलीची अन्ननलिका बंद झाली होती. जेवण केले की उलटी व्हायची. जन्मापासून ते आतापर्यंत ती द्रवपदार्थावरच होती. यामुळे ती अतिशय अशक्त झाली होती. मेडिकलच्या ‘बालशल्यक्रिया मिशन’मध्ये तिचा समावेश करण्यात आला. तिच्यावर सोमवारी दुर्बिणद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून अन्ननलिकेमधील ‘ब्लॉक’ दूर करण्यात आले. यामुळे लवकरच ती जेवू शकणार आहे.गर्भात असतानापासून होती किडनीवर सूजगर्भात असतानापासून एका बाळाच्या किडनीवर खूप मोठी सूज होती. लघविच्या पिशवितून लघवी एका विशिष्ट दिशेने न जाता वरच्या दिशेन जात होती. पाच महिन्याच्या या बाळावर अत्यंत गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर