शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

उपराजधानीत घटला बालमृत्यू दर

By admin | Updated: May 31, 2014 01:05 IST

उपराजधानीत २0११ मध्ये बालमृत्यू दर प्रति एक हजारामागे २२ होते. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने (आयएपी) ‘फस्र्ट गोल्डन मिनिट’ अभियान हाती घेतल्याने बालमृत्यू दर प्रति एक हजारामागे

प्रति हजारामागे १८ मृत्यू : ‘फस्र्ट गोल्डन मिनिट’ अभियानाचे यशनागपूर : उपराजधानीत २0११ मध्ये बालमृत्यू दर प्रति एक हजारामागे २२ होते. इंडियन अकॅडमी  ऑफ पेडियाट्रिक्सने (आयएपी) ‘फस्र्ट गोल्डन मिनिट’ अभियान हाती घेतल्याने बालमृत्यू दर  प्रति एक हजारामागे १८ पर्यंंंंत पोहोचला आहे. अभियानाला मिळालेले हे यश देशाच्या  कानाकोपर्‍यात पोहोचविण्याचा आयएपीचा प्रयत्न आहे, अशी माहिती आयएपीचे राज्य संयोजक  व बालरोग तज्ज्ञ डॉ. आकाश बंग यांनी आज पत्रपरिषदेत दिली. डॉ. बंग यांनी सांगितले की, जन्मानंतर पहिला मिनिट खूप निर्णायक असतो. ज्याला गेाल्डन मिनिट  म्हणतात; कारण जास्तीतजास्त बालमृत्यू याच वेळात होतात. भारतात दर मिनिटाला दोन बाळाचा  मृत्यू होतो. बाळ जन्मत:च मृत्यूचे प्रमाण १0 लाख आहे. यात ३0 टक्के मृत्यू हा ‘अँस्पेक्शिया’मुळे   (मूल जन्मल्यानंतर त्याला श्‍वास घेताना होणारा त्रास) होतो. यातून जे वाचतात ते अनेक  आजारांच्या विळख्यात सापडतात. विशेष म्हणजे,‘अँस्पेक्शिया’मुळे आईच्या पोटातच मृत  झालेल्या बाळाची शासनाकडे नोंद नाही. ‘अँस्पेक्शिया’ टाळण्यासाठी बाळ जन्माच्या पहिल्या  मिनिटात त्याला श्‍वास देण्यासाठी डॉक्टरांसह परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना याचे  प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्याचे आयएपीचे कोषाध्यक्ष डॉ. बाकुल पारेख यांनी सांगितले की, जन्माच्या पहिल्या मिनिटात  श्‍वास न घेण्याच्या स्थितीमुळे ४0 टक्के बाळांचा मृत्यू होतो. जर प्रशिक्षित व्यक्तीने बाळ श्‍वास घेत  नसल्याचे लक्षणे ओळखून पहिल्या मिनिटाच्या अवधीत त्याला श्‍वास देण्यास मदत केल्यास  जास्तीतजास्त मुलांना वाचविणे शक्य आहे. यामुळेच हे अभियान हाती घेण्यात आले आहे. यात  ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ने मदत केली आहे. या अभियानात २.५0 लाख डॉक्टर,  पॅरामेडिकल, परिचारिका व तंत्रज्ञ यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. (प्रतिनिधी)