शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चिमुकल्याचे अपहरण करून हत्या; सोनेगाव तलावात मिळाला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 15:29 IST

गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पोत्यात मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे२७ मार्चला झाले होते अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पोत्यात मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामल्यात राहत होता. त्याचे अपहरण करणाऱ्याने ही हत्या केली असावी, असा संशय आहे.२७ मार्चला वंश अचानक बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण झाले असावे, असा संशय पालकांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत व्यक्त केला होता. पोलिसांनी अपहरणाची नोंद केली. मात्र, फारसा गांभिर्याने तपास केला नाही. मुलांचे आईवडील आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते चिमुकल्या वंशचा गेल्या दहा दिवसांपासून शोध घेत होते. गुरुवारी सकाळी ७ वाजता सोेनगाव तलावाच्या कोरड्या भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका पोत्यातून दुर्गंध येत असल्याने आजुबाजूच्यांनी चौकशी केली. पोत्यात बालकाचा मृतदेह असल्याचे लक्षात येताच पोलिसांना कळविण्यात आले. ठाणेदार पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. बालकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्याच्या शरीरावरचे कपडेही फाटले होते. पोलिसांनी लगेच श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना बोलवून घेतले. माहिती कळताच गुन्हे शाखेचे पथकही पोहचले. दरम्यान, शहरातील कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालकाच्या बेपत्ता होण्याची नोंद आहे, त्याची सोनेगाव पोलिसांनी माहिती घेतली. प्रतापनगर ठाण्यातून २७ मार्चला वंश बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी वंशच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलवून घेतले. त्यानंतर या भागातील सामाजिक कार्यकर्ते वंशच्या नातेवाईकांना घेऊन तेथे पोहचले. वंशचा मृतदेह पाहून त्याचे आईवडील बेशुद्धच पडले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांची एकच आक्रोश केला.तीन दिवसांपूर्वीच फेकला मृतदेहचिमुकल्याचे अपहरण करून हत्या केल्याचे वृत्त पसरताच शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी धावपळ सुरू केली. या भागातील सामाजिक कार्यकर्ते पंजू तोतवाणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह परिसरात चौकशी केली असता एका आॅटोवाल्याने त्यांना संशयीत आरोपीचा धागा दिला. राजा नामक तरुणाने तीन दिवसांपूर्वी सोनेगाव तलावात पाणी किती आहे, अशी विचारणा केली होती. त्यामुळे या अपहरण आणि हत्याकांडाशी त्याचा संबंध असावा, असा दाट संशय निर्माण झाला. ही माहिती तोतवाणी यांनी प्रतापनगर आणि सोनेगाव ठाण्यात दिली. पोलिसांनी संशयीत आरोपीला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर आरोपीची चौकशी सुरू होती.

टॅग्स :Crimeगुन्हा