शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाला घातले साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 23:00 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावे, समाजाला दिशा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नागपूर, दि. 2 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावे, समाजाला दिशा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीनगर गणेश मंडळाला भेट दिली. श्री पूजन केले. मंडळातर्फे धातूची मूर्ती स्थापित केली जाते, याचे त्यांनी कौतुक केले. मंडळातर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके गोळा करून त्या वितरित केल्या जातात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वही-पुस्तक गणरायाच्या चरणी अर्पण करून सर्वांना शिक्षण लाभू दे, अशी प्रार्थना केली. मंडळातर्फे राबविण्यात येणा-या सामाजिक उपक्रमांची त्यांनी प्रशंशा केली. या वेळी महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरपीएफ बॅरेक अजनी येथील रेल्वे सुरक्षा बल गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन दर्शन घेतले. यासोबतच पांडे ले-आऊट येथील उत्कर्ष सांस्कृतिक मंडळ, भेंडे ले-आऊट येथील श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, जयताळा एकात्मतानगर व उज्ज्वल सोसायटी येथील नवयुवक गणेश मंडळ, सरस्वती विहार कॉलनी त्रिमूर्तीनगर येथील सरस्वती विहार गणेशोत्सव मंजळ, प्रतापनगर येथील साहस गणेशोत्सव मंडळ, अभ्यंकरनगर सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, कॉर्पोरेशन कॉलनी गणेश उत्सव मंडळ, रामदासपेठ फार्मलॅण्ड गणेश उत्सव मंडळ, इमामवाडी येथील श्री गणेशोत्सव मंडळ, भगवान नगर येथीलल युवा गणेशोत्सव मंडळ, नरेंद्र नगर येथील महागणपती, मनीष नगर येथील पॅन्थॉन नगर आश्रय उत्सव समिती आदी मंडळांना भेट धेऊन गणरायाचे दर्शन घेतले. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व निरोगी व आनंदी जीवनाची मनोकामना केली. मुख्यमंत्री ‘बिफोर टाईम’- कामी मंडळांना मुख्यमंत्र्यांनी बिफोर टाईम भेट दिली. मुख्यमंत्री येणार म्हणून कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. प्रत्येक जण तयारीला लागले होते. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ताफा येऊन पोहचला. वेळेपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस पोहचल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांना काय करावे ते सूचेनासे झाले होते. 

सेल्फिसाठी कार्यकर्त्यांचा आग्रह - गणेश मंडळांना भेटी दिल्यानंतर मंडळांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांसोोबत सेल्फी काढून घेण्यास आग्रही दिसले. मुख्यमंत्र्यांनीही ब-याच ठिकाणी कार्यकर्त्यांचे मन राखत सेल्फी काढून घेतला. 

मुख्यमंत्र्यांवरील विघ्न टळो- काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉफ्टर अपघातातून बचावले. नागपूरचे पूत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांवर आता कुठलेही विघ्न येऊ देऊ नको, असे साकडे गणेश मंडळांनी गणरायांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घातले. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव