शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मिशन इलेक्शन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 01:04 IST

मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना एकत्र करीत विकासाची गाडी दामटण्यास सुरुवात केल्याने ही अप्रत्यक्षपणे ‘मिशन इलेक्शन’ ची सुरुवात मानली जात आहे.

ठळक मुद्देरामगिरीवर घेतली खासदार, आमदार व नगराध्यक्षांची बैठकनगर परिषदांच्या विकासाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवड्यात भंडारा- गोंदियातील लोकप्रतिनिधींची विशेष बैठक घेतल्यानंतर आता शनिवारी त्यांनी ‘रामगिरी’ येथे पूर्व विदर्भातील खासदार, आमदार व नगराध्यक्षांची बैठक घेतली. नगर परिषदांच्या विकासावर लक्ष केंद्रित करीत बैठकीत त्यांनी नगराध्यक्षांना प्रत्यक्ष काम करताना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकप्रतिनिधींना एकत्र करीत विकासाची गाडी दामटण्यास सुरुवात केल्याने ही अप्रत्यक्षपणे ‘मिशन इलेक्शन’ ची सुरुवात मानली जात आहे.रामगिरीवर झालेल्या बैठकीत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह खासदार अशोक नेते, खा. रामदास तडस, आ. अनिल सोले, परिणय फुके, विजय रहांगडाले, आशिष देशमुख, समीर मेघे, सुधीर पारवे, समीर कुणावार, बाळा काशीवार, रामचंद्र अवसरे यांच्यासह नगराध्यक्ष सुनील मेंढे, अशोक इंगळे, प्रेम झाडे, चरणसिंग ठाकूर, आदी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नगर परिषदेचा आढावा घेतला. बहुतांश नगर परिषदेत थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यांना काम करताना कोणत्या अडचणी येत आहेत, प्रशसाकीय सहकार्य किती मिळत आहे, कोणत्या बाबींवर शासनातर्फे सुधारणा करणे अपेक्षित आहे, शासनाकडे कोणत्या फाईल्स प्रलंबित आहेत, कोणत्या विकास कामांसाठी निधीची गरज आहे, आदी बाबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणून घेतल्या. नगराध्यक्षांनी आपापल्या अडचणी मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.कामे करा, संपर्कात रहा बैठकीत नगराध्यक्ष व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना विकास कामे करा व जनतेच्या संपर्कात रहा, असा सल्ला दिला. नगराध्यक्ष म्हणून सर्व नगरसेवकांना सांभाळणे, त्यांना विश्वासात घेऊन काम करणे, नगरसेवकांनाही जनतेच्या संपर्कात राहण्यास सांगणे आदी जाबबादारी चोखपणे पार पाडा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या अर्थसंकल्पात नगर परिषदांसाठी भरीव तरतूद करण्याची हमीही त्यांनी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर