बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ()
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पार्टीतर्फे महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव रमेश पाटील, शहर अध्यक्ष शरद वंजारी, आशिर्वाद कापसे, रईस अंसारी, इमरान, सी.डी. वाघमारे, दीलिप पाझारे, विलाख पारखंडे, वासुदेव मेश्राम, प्रवीण खापर्डे, राजेश कांबळे, राजू घोडेस्वार उपस्थित होते.
हिवरीनगर चौकात शिवसेनेची शिवजयंती ()
शिवसेनेच्या वतीने हिवरीनगर येथील शिवाजी चौकात शिवजयंती साजरी झाली. माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे, बंडुभाऊ तागडे यांच्या हस्ते पुजन झाले. स्मारक समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. यावेळी चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी महेंद्र कठाणे, राजेश बांडेबुचे, नरेंद्र मगरे, जगतराम सिन्हा, गणेश डोईफोडे, ओंकार पारवे, दीपक शेंरदे, योगेश न्यायखोर, हरिभाऊ बानाईत, गुलाबराव भोयर, प्रमोद मोटघरे, प्रवीण काकडे, सतीश कुडे, श्याम तेलंग, डॉ. भोजवानी, शशिकांत ठाकरे, सलमान खान उपस्थित होते.