शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘छडी लागे छम छम ’ आता होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:03 IST

छडी लागे छम छम.. विद्या येई घम घम... बालपणी एकलेली म्हण आता कालबाह्य होणार आहे. कारण शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार विभागाने हा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्थैर्य राखण्यासाठी विभागाचा निर्णयराष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छडी लागे छम छम.. विद्या येई घम घम... बालपणी एकलेली म्हण आता कालबाह्य होणार आहे. कारण शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार विभागाने हा निर्णय घेतला आहे.गृहपाठ केला नाही, शाळेत दंगा केला, अभ्यास केला नाही, पाढे पाठ केले नाहीत, अशा विविध कारणांसाठी अंगठे धरायला लावणे, भिंतीला खुर्चीसारखे उभे करणे, यासह हातावर छम छम छड्याही पडायच्या. मुलांचा हात रक्तबंबाळ होत असे. पण त्याची पर्वा शिक्षकांना नसे. त्या काळातील शिक्षक मारकुटे होते, तरी त्यांचे आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेमही होतं. आपल्या विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे, आपल्या घराचे, गावाचे, देशाचे नाव मोठे करावे, असे त्यांना वाटत असे. त्यामुळेच मार खाल्लेल्या त्या विद्यार्थ्यांची शाळेबद्दलची ओढ कायमच असायची. तेव्हा पालकही शिक्षकांनी मारहाण केली तरी शिक्षकाला जाब विचारायला जात नसत. विशेष म्हणजे तेव्हा मारकुटा मास्तर म्हणजे अधिक चांगला अशी समजूत होती. छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, यावर पालकांचा आणि समाजाचाही विश्वास होता.परंतु कालांतराने शिक्षणाच्या पद्धतीत बदल करण्यात आले. आनंददायी शिक्षणाची नवी परंपरा सुरू झाली. मुलांना शाळेबद्दल ओढ लागायला हवी, त्यांना शाळेत जावेसे वाटावे, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागावे, अशी सरकारच्या शिक्षण खात्याची अपेक्षा आहे. त्यातच २००९ मध्ये लागू झालेल्या बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यातच बालकांना शारीरिक शिक्षा आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने सुद्धा गुरुजींच्या छडीवर आक्षेप घेतला आहे. आनंददायी शिक्षणाच्या नादात शिक्षण विभागाने गुरुजींच्या हातची छडीही गायब केली आहे.शुक्रवारी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळेमधून छडी वगळण्याच्या आदेश शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. विद्यार्थ्यांमधील धाक संपेलआजचा विद्यार्थी तांत्रिक झाला आहे. कॉम्प्युटर, मोबाईल यात त्याचा सर्वाधिक वेळ जात आहे. पालकांवर चिडचिड करायला लागला आहे. आनंददायी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील शिक्षकांची भीतीही हरविली आहे. गुरुजींची छडी ही मारण्यासाठी नव्हतीच, तो धाक होता, जो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. छडी गायब केल्याने हा धाकच संपणार आहे.सपन नेहरोत्रा, शिक्षक

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी