शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार उर्दू शाळांची उद्यापासून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:59 IST

राज्यातील चार हजारांवर उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता मुलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानुसार आता अध्यापन होते किंवा नाही, याची पडताळणी केली जाणार आहे.

ठळक मुद्दे५५ तज्ज्ञांची चमू दौऱ्यावरपाच दिवस १५ जिल्ह्यात करणार तपासणी

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील चार हजारांवर उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता मुलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानुसार आता अध्यापन होते किंवा नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी विद्या प्राधिकरणाने ५५ तज्ज्ञांची चमू सज्ज केली असून ही चमू पुढील पाच दिवस १५ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शाळेत जाऊन झाडाझडती घेणार आहे.प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत वाचन क्षमता विकसित झाली पाहिजे, यासाठी विद्या प्राधिकरणाने मराठीसह उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी विशेष मोहीम राबविली होती. यात उर्दू माध्यमाच्या ४ हजार १५६ शाळांचा समावेश होता. या शाळांमधील ८ हजार ३१२ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. नव्या प्रकारचे अध्यापन अधिक प्रभावी व्हावे यासाठी राज्यस्तरावर प्रशिक्षक तयार करून त्यांच्याकडे एकेका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती.आता प्रशिक्षित झालेले शिक्षक योग्य अध्यापन करीत आहेत किंवा नाही, याची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी पहिल्या टप्प्यात १५ जिल्हे निश्चित करण्यात आले असून १६ ते २० मार्च या पाच दिवसात प्रत्यक्ष शाळेत पोहोचून तपासणी केली जाणार आहे.या जिल्ह्यांमध्ये होणार तपासणीअमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, रायगड, अहमदनगर, लातूर, नाशिक, ठाणे, पालघर, हिंगोली, जालना, मुंबई, धुळे, जळगाव या १५ जिल्ह्यात १६ मार्चपासून तपासणी सुरू होणार आहे. यावेळी तज्ज्ञ सर्वप्रथम शाळाव्यवस्थापन समितीकडून आढावा घेणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष वर्ग अध्यापनाची पाहणी करणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा