शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखाचे आमिष दाखवून ग्रामस्थांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:19 IST

बेटी बचाव बेटी पढाव अभियानात दोन लाख रुपयांचा लाभ मिळण्याचे आमिष दाखवून, ग्रामस्थांकडून अर्ज भरून घेत लुबाडणूक करण्यात येत आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. ग्रामस्थांनी अभियानाचा अपप्रचार करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ अभियानाच्या नावावर अपप्रचार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : बेटी बचाव बेटी पढाव अभियानात दोन लाख रुपयांचा लाभ मिळण्याचे आमिष दाखवून, ग्रामस्थांकडून अर्ज भरून घेत लुबाडणूक करण्यात येत आहे. ही बाब जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. ग्रामस्थांनी अभियानाचा अपप्रचार करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी नागपुरसह देशभरात बेटी पढाओ बेटी बचाओ ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना पूर्णत: प्रचार प्रसिध्दीची योजना आहे. मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, लिंग गुणोत्तर वाढविणे आदी उद्दिष्टे यात ठेवण्यात आली आहे. यासाठी विविध पातळीवर प्रचार-प्रसिध्दी चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात येत आहे. परंतु काही मध्यस्थ व काही संस्था या योजनेच्या नावाखाली जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची लूबाडणूक करीत असल्याचे लक्षात येत आहे. त्यात अशा व्यक्ती व संस्था मुलींचा नावे अर्ज भरुन घेत, त्यापोटी अर्जाची किंमत व नोंदणी शुल्क वसूल करीत आहे. तसेच मुलींच्या नावे २ लाख रुपयापर्यंत लाभ मिळण्याचे आमिष देत आहे. अशा मौखिक तक्रारी जि.प.च्या महिला व बाल विकास विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. सदरची योजना ही पूर्णत: प्रचार प्रसिध्दीची योजना असून, समाजात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी लोकांची जनजागृती करण्याची ही योजना आहे. यात कुठल्याही प्रकारचा रोख स्वरुपाचा लाभ देण्यात येत नाही. तरी ग्रामीण जनतेने कुठल्याही भूलथापांना बळी न पडता अशा व्यक्ती संस्थांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन जि.प.च्या महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी भागवत तांबे यांनी केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर