शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली नागपुरात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 11:21 IST

नागपुरात गॅस कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून आणि त्यावर कंपनीचा ट्रेड मार्क वापरून सायबर टोळीने अनेकांची गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली फसवणूक केली.

ठळक मुद्देकंपनीची बनावट वेबसाईटसायबर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गॅस कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून आणि त्यावर कंपनीचा ट्रेड मार्क वापरून सायबर टोळीने अनेकांची गॅस एजन्सी देण्याच्या नावाखाली फसवणूक केली. ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडतर्फे पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली. या प्रकरणी शनिवारी सायबर टोळीविरुध्द सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडतर्फे गो गॅसचे उत्पादन केले जाते. कंपनीतर्फे ठिकठिकाणी वितरक नियुक्त करण्यात आले आहे. डिसेंबर २०१८ पासून कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून त्यावर कंपनीचा ट्रेड मार्क वापरून ठिकठिकाणी गॅस एजन्सी देणे आहे, अशी जाहिरात केली जात आहे. त्या जाहिरातीवर विश्वास ठेवून अनेकांनी गॅस एजन्सी मिळवण्यासाठी प्रयत्न चालविले. संपर्क करणाऱ्यांसोबत सायबर टोळीतील आरोपी मेल तसेच मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करून गॅस एजन्सी देण्याच्या बदल्यात सुरक्षा ठेव आणि अन्य कारणे सांगून रक्कम मागत होते. कंपनीचा ट्रेड मार्क आणि वेबसाईट बघून गॅस एजन्सी घेण्यास इच्छूक असणाऱ्यांना प्रथमदर्शनी कसलाही संशय येत नसल्याने अनेकांनी सायबर टोळीकडे संपर्क साधला. गॅस एजन्सी देण्याघेण्यासाठी अनेक शासकीय विभागाची परवानगी आवश्यक असते. सायबर टोळीने त्या बनावट परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्राची प्रतही तयार करून ठेवल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसला. त्यामुळे मेटल सिलेंडर आणि गो गॅस एलिट (कम्पोजिट सिलेंडर)ची एजन्सी मिळवण्यासाठी अनेकांनी टोळीतील सदस्यांना मोठी रक्कम दिली. टोळीतील सदस्यांकडून वारंवार रक्कम मागितली जात असल्याने काहींना संशय आला. त्यामुळे रक्कम जमा करणाऱ्यांनी गो गॅसच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यामुळे या टोळीचे बिंग फुटले. कंपनीची बनावट वेबसाईट, ट्रेड मार्कच नव्हे तर बनावट शासकीय कागदपत्रांचा वापर करून सायबर टोळी अनेकांना गंडा घालत असल्याचे स्पष्ट झाल्याने कंपनीतर्फे अभिजित ईश्वर बोंडे (वय २८, रा. शिवणगाव) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी हे प्रकरण सायबर सेलकडे तपासासाठी दिले. आरोपी डिसेंबर २०१८ पासून ही बनवाबनवी करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने सायबर सेलकडून सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दिल्ली-नोएडात टोळी सक्रियतंत्रज्ञानाचा गैरवापर करून विविध कंपन्या, उद्योजक, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना फसवून त्यांची रक्कम ऑनलाईन हडप करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या दिल्ली, नोएडात सक्रिय आहेत. या टोळ्या केवळ खासगीच नव्हे तर शासकीय यंत्रणांच्याही बनावट वेबसाईट तयार करतात. त्यांनी गो गॅस सारख्याच अनेक कंपन्यांची एजन्सी देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडविले असावे, असा संशय आहे. पोलिसांनी या टोळीचा छडा लावण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी