शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सेवानिवृत्त आयकर अधिकाऱ्याला ६८ लाखाने फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:09 IST

वित्त मंत्रालय दिल्ली येथील अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी एका सेवानिवृत्त आयकर अधिकाऱ्यास ६८ लाख रुपयाचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपेन्शन फंड मिळवून देण्याचे दाखवले आमिष : आरोपींनी स्वत:ला वित्त मंत्रालयाचे अधिकारी सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वित्त मंत्रालय दिल्ली येथील अधिकारी असल्याचे सांगून आरोपींनी एका सेवानिवृत्त आयकर अधिकाऱ्यास ६८ लाख रुपयाचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.माधव महादेवराव चिमूरकर (६९) रा. पूर्व वर्धमाननगर असे फिर्यादी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या वर्षी ४ फेब्रुवारी २०१७ रोजी चिमूरकर यांना मोबाईलवर आरोपीचा फोन आला. त्याने आपले नाव मनीष जैन असे सांगितले. तसेच तो वित्त मंत्रालय दिल्ली येथे अधिकारी असल्याचा परिचय दिला. आरोपीने फोनवर बोलताना चिमूरकर यांना सांगितले की, त्यांनी २०१४ पासून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रक्कम जमा केली आहे. त्यावर ९ लाख ८३ हजार ४३८ रुपये देण्यात येतील. तसेच केंद्रीय विशेष फंडमधून ४३ लाख ९२ हजार रुपये मिळणार असल्याचेही आमिष दाखवले. यानंतर आरोपी सोनिया बजाज, सुदेश साहू, अंजली ओबेरॉय, आर. के. कोठारी, उमेशचंद्र, अमित अरोरा नावाच्या बोगस अधिकाºयांनी चिमूरकर यांच्याशी संपर्क साधून शासकीय नियमानुसार पैसे रिलीज करण्यासाठी आवश्यक दस्तावेज प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. याप्रकारे लोकल एनओसी, स्टॅम्प पेपर, सर्वर चार्ज, लीगल सर्टिफिकेट, बँक सेक्युरिटी आदी दस्तावेज चार्जच्या नावावर हळूहळू बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. याप्रकारे चिमूरकर यांनी फेब्रुवारी २०१७ पासून २६ मार्च २०१८ पर्यंत ६८ लाख ४ हजार १९९ रुपये जमा केले. यानंतरही त्यांच्या खात्यात पेन्शन फंड किंवा इतर कुठलीही रक्कम जमा झाली नाही. आरोपींच्या मोबाईल नंबरवरही संपर्क होत नव्हता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चिमूरकर यांनी गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे लिखित तक्रार दाखल केली. सायबर सेलने चौकशीनंतर त्यांची फसवणूक झाल्याची पुष्टी होताच, हे प्रकरण लकडगंज पोलीस ठाण्यात रेफर केले. लकडगंजचे पीएसआय मसराम यांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :fraudधोकेबाजीIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय