शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

नागपुरातील आयडीबीआय बँकेला पावणेदोन कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:46 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज प्रकरण तयार करून आयडीबीआय बँकेला १ कोटी ७४ लाखांचा गंडा घालणाऱ्या १६ आरोपींविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल करून अटक करण्याची ही घडामोड झाली.

ठळक मुद्देपीक कर्ज घोटाळा उघड : १६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : १२ गजाआड, ४ फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे पीक कर्ज प्रकरण तयार करून आयडीबीआय बँकेला १ कोटी ७४ लाखांचा गंडा घालणाऱ्या १६ आरोपींविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल करून अटक करण्याची ही घडामोड झाली.राजेश कोठीराम गुहे, संतोष बजरंग नंदागवळी, अनिल हिरामण घोडे, सारंग अशोकराव चिटकुले, रामाजी कौडूजी भेंडे, जसवंतसिंग बलबीरसिंग प्रधान, पतिराम बाबुलाल बावनकर, लखनलाल चंदनलाल राठोड, योगिराज बालकिशन बिटले, सचिन अशोकराव चिटकुले, प्रशांत पुंडलिकराव बोरकर, मंजितसिंग बलबीरसिंग प्रधान, योगिराज आदे, अनुपसिंग बलवंतसिंग प्रधान आणि विकास मधुकर काकडे अशी फसवेगिरी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.कळमन्यातील प्रशांत बोरकर हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. त्याने बँकेला चुना लावण्याचा कट पाच वर्षांपूर्वी रचला. त्यानुसार २०१३ मध्ये त्याने मानकापुरात (गोधनी) आयडीबीआयच्या शाखेत ७/१२, पत प्रमाणपत्र, गहाणपत्र अशी बनावट कागदपत्रे सादर करून उपरोक्त साथीदारांच्या मदतीने १६ कर्ज प्रकरणे सादर केली. २०१३-१४ मध्ये बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करून त्यांना १ कोटी ३५ लाख ९ हजार ९७५ रुपयांचे कर्ज दिले. दरम्यान, कर्ज उचलल्यानंतर परतफेडीचे हप्ते येत नसल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असता या १६ च्या १६ ही प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे बँकेतर्फे गुन्हे आर्थिक शाखेत तक्रार नोंदवण्यात आली. कर्जाची रक्कम आणि व्याजासह बँकेला १ कोटी ७३ लाख ८० हजारांचा गंडा घालण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाची कसून चौकशी केली असता यातील सूत्रधाराने शेतमजुरी करणाऱ्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकरी बनवून कर्ज लाटल्याचेही उघड झाले. त्यामुळे सोमवारी बँक व्यवस्थापक प्रदीपकुमार भालचंद्र लघाटे यांच्या तक्रारीवरून मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल करून १६ पैकी १२ जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा २३ नोव्हेंबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला.अनेकांची भूमिका संशयास्पदया कर्ज घोटाळ्यात पटवाऱ्यापासून बँक अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांचीही पोलीस गुप्त चौकशी करीत आहेत. आरोपींची संख्या वाढू शकते, असेही अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, या प्रकरणात मंजितसिंग प्रधान, योगिराज आदे, अनुपसिंग प्रधान आणि विकास काकडे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी